शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

टॉवरसाठी शेतकऱ्यांची जागा जात असल्याने त्यांना रेल्वे आणि महापारेषणतर्फे योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र रेल्वे विभागाने ठरल्याप्रमाणे मोबदला न देता अल्प मोबदला देऊन पोलीस विभागातंर्गत नोटीस दिली जात आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून त्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा असे निर्देश आढावा बैठकीत अधिकाºयांना आ.विजय रहांगडाले यांनी दिले.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : आढावा बैठकीत दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतातून महापारेषण कंपनीची टॉवर लाईन गेली आहे. टॉवरसाठी शेतकऱ्यांची जागा जात असल्याने त्यांना रेल्वे आणि महापारेषणतर्फे योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र रेल्वे विभागाने ठरल्याप्रमाणे मोबदला न देता अल्प मोबदला देऊन पोलीस विभागातंर्गत नोटीस दिली जात आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून त्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा असे निर्देश आढावा बैठकीत अधिकाºयांना आ.विजय रहांगडाले यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पवार, तहसीलदार प्रशांत घोरुडे, तहसीलदार शेखर पुनसे,रेल्वे व महापारेषण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.कलपाथरी मध्यम प्रकल्पाचे पुनर्वसन न.प.गोरेगाव येथील कृषक जमिनीवर करुन त्याला गावठाण म्हणून घोषीत करण्यात आले. त्या प्रपत्रानुसार गावठाण जमीन घोषीत करण्यात आलेल्या जमिनीची आखीव पत्रिका (एनए) तयार करावयाचे होते. परंतु अद्यापही आखिव पत्रिका तयार करण्यात आलेल्या नाही. सन २०१७ मध्ये पासून सदर प्रकरण प्रलंबित आहे.गोरेगाव येथील तहसीलदारांनी भूमी अभिलेख विभागाशी संपर्क साधून त्वरीत कार्यवाही करावी असे निर्देश रहांगडाले यांनी दिले. पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत तिरोडा विभानसभा क्षेत्रातील सगळ्यात जास्त प्रमाणात शेतकऱ्यांचे खाते सहकारी बँकेत आहे. या बँकेतील खातेदारांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळालेला नाही. तर ऑनलाईन यादीमध्ये जवळपास ८० टक्के लाभार्थी दाखवीत आहे. याविषयी मोठ्या प्रमाणात शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त होतात. यावर जिल्हाधिकारी यांनी आठ दिवसाच्या आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे पैसे जमा झाले नाहीत त्यांचे आधारकार्डवर असलेले नाव अद्यावत करण्याचे आदेश दिले. महात्मा फुले वार्ड नं. प. तिरोडा येथे अतिक्रमणधारकांना पट्टे मिळण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरुन त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देता येईल. मौजा बेरडीपार (काचे.) येथे लोहझरी तलावाकरीता लघु पाटबंधारे तलाव शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे.या तलाव बांधकामाकरीता रामपुरी, बरबसपुरा, बेरडीपार, नहरटोला येथील शेतकऱ्यांनी जमिनी शासनाकडे हस्तांतरीत केल्या होत्या. परंतु तांत्रिक अडचणीमुळे सदर तलावाचे काम शासनातर्फे रद्द करण्यात आले. आजही या शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यांवर तलाव अधिग्रहण नोंद असे नमूद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन खरेदी विक्री करण्याकरीता अडचण निर्माण होत आहेत. सदर प्रकरण मार्गी लावण्याकरीता शासनाकडे त्वरीत अहवाल पाठविण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आ. विजय रहांगडाले यांनी दिले.

टॅग्स :Socialसामाजिक