शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

डॉक्टर द्या, अन्यथा दवाखाना बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:00 IST

गावात आयुर्वेदिक दवाखाना आहे. परंतु दोन महिन्यांपासून डॉक्टर नाही. त्यामुळे दवाखाना वाºयावर सुरू आहे. आम्हाला डॉक्टर द्या, अन्यथा दवाखाना बंद करा, असा संताप नागरिकांनी आरोग्य विभागावर व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांची मागणी : कुलूप ठोकण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : गावात आयुर्वेदिक दवाखाना आहे. परंतु दोन महिन्यांपासून डॉक्टर नाही. त्यामुळे दवाखाना वाºयावर सुरू आहे. आम्हाला डॉक्टर द्या, अन्यथा दवाखाना बंद करा, असा संताप नागरिकांनी आरोग्य विभागावर व्यक्त केला आहे.सदर दवाखाना हा गोठणगाव प्राथमिक केंद्रांतर्गत येतो. पण गोठणगाव केंद्राचा सुद्धा कारभार समाधानकारक सुरू नाही. येथील दवाखाना सुरळीत सुरु होता. मात्र येथील डॉ. कुलदीप बघेले १६ आॅगस्टला बदली झाली. तेव्हापासून दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी डॉक्टरविनाच कारभार सुरू आहे. डॉक्टरची नियुक्ती न केल्याने हा दवाखाना परिसरातील रुग्णांसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. दवाखान्यात कोणतेही उपचार होत नाही. शिपाई आहे तो फक्त दवाखाना उघडतो व आपली नोकरी म्हणून दवाखान्यात बसतो. मात्र उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर नसल्याने त्यांना आल्या पावली परत जावे लागते.येथील डॉक्टरची बदली झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. सदर डॉक्टरची बदली रद्द करुन पुन्हा त्यांचीच नियुक्ती करण्याची मागणी आहे. अन्यथा दवाखान्याला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे. आठ दिवसांत डॉक्टरची नियुक्ती व औषधांचा पुरवठा करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.डी.निमगडे यांनी दिले होत. मात्र याला पंधरा दिवसांचा कालावधी लोटूनही डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे. परिसरातील लोकप्रतिनिधी समस्या सोडविण्यासाठी समोर येत नाही. फक्त उद्घाटन, भूमिपूजन करण्यासाठीच येतात. त्यामुळे परिसरातील बाराभाटी, येरंडी, कुंभीटोला, बोळदे, कवढा, डोंगरगाव, ब्राम्हणटोला, सुकळी येथील गावकऱ्यांमध्ये रोष आहे.सुविधांचा अभावया आयुर्वेदिक दवाखान्यात सायरप नाही. पिण्याचे पाणी भरता येत नाही, पाण्याची सुविधा नाही. अनेक वर्षांपासून पाण्याची मोटार बंद आहे. प्राथमिक उपचाराच्या सुध्दा गोळ्या औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना बाहेरुन औषधे खरेदी करावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे.मागील आठवड्यात डॉक्टरांची नियुक्ती झाली असती पण डॉक्टरांचा तुडवडा आहे. मी डॉक्टर पाठविण्याच्या तयारीत आहे. लवकरच डॉक्टरांची सोय केली जाईल.डॉ.एस.डी. निमगडेजिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य