शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
2
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
3
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
4
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
5
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
6
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
7
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
8
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
9
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
10
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
11
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
12
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
13
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
14
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
15
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
16
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
17
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
18
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
19
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
20
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत

चक्रीवादळ बाधितांना त्वरित भरपाई द्या

By admin | Updated: May 24, 2016 01:57 IST

शनिवारी आलेल्या चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्हाभरातील अनेक गावांत नागरिकांचे मोठेच नुकसान झाले.

घरांसह पिकांचे नुकसान : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनगोंदिया : शनिवारी आलेल्या चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्हाभरातील अनेक गावांत नागरिकांचे मोठेच नुकसान झाले. शेतपीक नष्ट झाले. शेकडो घरांच्या भिंती कोसळल्या. छत उडाले. भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांचे वृक्ष पडल्याने मोठे नुकसान झाले. पशूधनाची हानी झाली. विद्युत पोल पडले. यापूर्वी एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळ व वीज पडल्याने सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यासाठी निवेदन दिले. निवेदनानुसार, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांचे झालेल्या नुकसानीचे सर्वेेक्षण करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बघता अधिकाधिक सहायत प्रदान करण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस पडल्याने आधीच शेतकरी त्रस्त आहेत. यावर्षी विंधन विहिरींच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान लावले. तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळपिके लावली. परंतु एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस, चक्रीवादळ व दोन दिवसांपूर्वी २१ मे रोजी संपूर्ण जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळाने शेतकरी व नागरिकांचे मोठेच नुकसान झाले. शेतकरी व शेतमजुरांचे घरे पडली. जनावरांचे गोेठे कोसळल्यामुळे जनावरांचा मृत्यू झाला. भिंती पडल्या व छत उडाल्यामुळे उघड्या आकाशाखाली अनेकांचे संसार आले. अनेक शेतकऱ्यांनी बागायती व फळबाग शेती लावली आहेत. मात्र अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे त्यांचे नुकसान झाले. दुष्काळी परिस्थिती असतानाही शासनाने जिल्ह्यात दुष्काळग्रस्त घोषित केले नाही. धानाच्या पिकासाठी आॅक्टोबर महिन्यात २०० मिमी पावसाची गरज होती, मात्र २ मिमी पाऊस पडल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. हे सर्व नुकसान बघता येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे पुरविण्यात यावे. संकटात फसलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासकीय व सहकारी बँकेच्या माध्यमातून कृषी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. बाधित घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई देण्यात यावी. पशूंच्या मृत्यूचे अवलोकन करून भरपाई देण्यात यावी. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. विद्युत पोल पडले आहेत. त्यांची दुरूस्ती त्वरित करण्यात यावी. मागील दोन वर्षांपासून रोजगार हमी योजनेच्या कामाची मजुरी देण्यात आली नाही. अशा बिकट परिस्थितीत प्रलंबित मजुरी त्वरित देण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे. याप्रसंगी आ. राजेंद्र जैन, माजी आ. दिलीप बंसोड, नरेश माहेश्वरी, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प. पक्ष नेते गंगाधर परशुरामकर, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, जिल्हा प्रवक्ता अशोक शहारे, शहर अध्यक्ष शिव शर्मा, तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार, जि.प. सदस्य सुखराम फुंडे, सुरेश हर्षे, राजेश भक्तवर्ती, बँक संचालक राजकुमार एन. जैन, रवि मुंदडा, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष केतन तुरकर, मुजीब पठान, टिकाराम मेंढे, करण गिल, संजिव राय, रौनक ठाकूर, संजू महाराज, बंशीधर अग्रवाल व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)