शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

‘त्या’ अनाथ मुलीच्या लग्नासाठी संसारोपयोगी वस्तुंची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 9:33 PM

जन्मदात्या मायबापाचे छत्र हिरावलेले १७ अनाथ मुले-मुली परिसरात वास्तव्याला आहेत. जवळच्या आप्त नातलगाच्या कृपादृष्टीने निरागस मुले जीवन जगत आहेत. समाजातील काही दानशुरांच्या मदतीने त्यांना वेळोवेळी मदत केली जात आहे.

ठळक मुद्देकठाणे परिवाराचे दातृत्व : मदतीसाठी पुढे आले दानदाते

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जन्मदात्या मायबापाचे छत्र हिरावलेले १७ अनाथ मुले-मुली परिसरात वास्तव्याला आहेत. जवळच्या आप्त नातलगाच्या कृपादृष्टीने निरागस मुले जीवन जगत आहेत. समाजातील काही दानशुरांच्या मदतीने त्यांना वेळोवेळी मदत केली जात आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मांडोखाल येथील एका अनाथ मुलीचे लग्न येत्या एप्रिल महिन्यात होऊ घातले आहे. सामाजिक बांधिलकी अंगीकारुन दैनिक लोकमतने त्या अनाथ मुलीच्या लग्नासाठी पुढे या आशयाची बातमी प्रकाशित केली होती. ती बातमी वाचून गोंदियाचे सेवानिवृत्त रेल्वे तिकीट निरीक्षक व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र कठाणे यांनी त्या अनाथ मुलीला संसारउपयोगी साहित्य भेट देऊन मदत केली.गोंदियाच्या कुंभारे नगरात वास्तव्याला असणारे महेंद्र कठाणे यांनी आपल्या एकुलत्या एक मिनाल या मुलाच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधून एक आगळा-वेगळा सामाजिक दायित्व पार पाडण्याचा कार्यक्रम रविवारला (दि.६) आयोजित केला होता. प्रसंगी ज्योती ठाकरे या अनाथ मुलीला संसारपयोगी वस्तुंचा संच कठाणे दाम्पत्यांनी भेट दिला. या वेळी प्रा.डॉ. सविता बेदरकर, सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे, धनेंद्र भुरले उपस्थित होते. बोंडगावदेवी परिसरातील अनाथ मुलांना वेळोवेळी सर्वोतोपरी मदत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अमरचंद ठवरे लोकमतच्या माध्यमातून वृत्त प्रकाशित करुन मदतीचे आवाहन करीत असतात. जिल्ह्यातून भरभरुन प्रतिसाद सुद्धा मिळतो. गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्त्यां बेदरकर यांच्या सहकार्याने आजही तालुक्यातील १७ अनाथ मुलांना घरपोच मदत केली जात आहे.कपाट भेट देणारअनाथ मुलीच्या लग्न कार्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्यासाठी सामाजिक दानदात्यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ तयारी दर्शविली. अर्जुनी मोरगाव येथील एस.एस.जे.महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ.कल्पना सांगोळे यांनी गोदरेज कपाट भेट देणार असल्याचे सांगितले. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष सोनदास गणवीर यांनी सुद्धा मदतीसाठी तयारी दर्शविली आहे.लोकमतचा पुढाकारअनाथांना नाथ मिळून त्यांच्या संसारात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी दैनिक लोकमतने वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. लोकमतच्या वृत्तांनी अनाथांना मदतीचा ओघ वाढत आहे. अनाथ मुलीच्या लग्न कार्यासाठी आपलाही हातभार लागावा या हेतूनी दानदात्यानी पुढे यावे असे अमरचंद ठवरे या सामाजिक कार्यकर्त्यांनी कळविले आहे.