शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

योजनांचा लाभ घेऊन समृद्ध व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:03 IST

केंद्र सरकारच्या सात योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा यासाठी १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान जिल्ह्यातील तीन गावांत ग्राम स्वराज अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांनी या योजनांचा लाभ घेवून समृद्ध व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केले.

ठळक मुद्देराजा दयानिधी : येरंडी-देव येथे ग्राम स्वराज अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारच्या सात योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा यासाठी १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान जिल्ह्यातील तीन गावांत ग्राम स्वराज अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांनी या योजनांचा लाभ घेवून समृद्ध व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केले.ग्राम स्वराज अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी-देवल येथे गुरूवारी (दि.१९) केंद्र सरकारचे या अभियानाचे नोडल अधिकारी फरीदा नाईक व राजेंदर कुमार यांनी भेट दिली. यानिमित्ताने ग्रामस्थांशी संवाद कार्यक्र मात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा परिषद सदस्य गिरीष पालीवाल, पं.स.उपसभापती करु णा नांदगाये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, राजेश राठोड, भिमराव पारखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, सरपंच रेखा खोब्रागडे, तहसीलदार भंडारी, गटविकास अधिकारी नारायण जमईवार प्रमुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना दयानिधी यांनी, यापुर्वी केंद्र सरकारच्या या योजनांचा गावातील ज्या कुटूंबांना लाभ मिळालेला नाही त्यांनी या अभियाना दरम्यान लाभ घ्यावा. सर्वांचे सहकार्य व सर्वांचा सहभाग या अभियानात आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या तीन योजनांचा गावातील प्रत्येक व्यक्तीने लाभ घ्यावा. यासाठी प्रत्येकाने बँक खाते काढावे. मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत गावातील कुठलाही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहू नये असे त्यांनी सांगितले.नाईक यांनी, जिल्ह्यातील यंत्रणा या अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे. केंद्र सरकारच्या ग्राम स्वराज अभियानांतर्गत असलेल्या सात योजनांचा लाभ गावातील प्रत्येक कुटूंबांनी घेतला पाहिजे. यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यास तसेच मार्गदर्शन करण्यास आपण आल्याचे त्यांनी सांगितले. विमा योजनेचा लाभ येरंडी ग्रामस्थ कमी प्रमाणावर घेत असल्याचे दिसून आले आहे असे सांगून त्यांनी, ग्रामस्थांनी स्वत:चे आरोग्य व सुरक्षेचा विचार करु न या विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी बँकेचे अधिकारी-कर्मचारी आपल्या गावात आले आहे. गावातील प्रत्येक घरी एलईडी बल्ब असले पाहिजे, त्यामुळे वीज बिलात बचत होते. ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांनी योजनेच्या लाभातून शौचालय बांधून घ्यावे. शौचालयाचा वापर देखील कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीने करावा असे त्यांनी सांगीतले.जितेंदर कुमार यांनी, केंद्र सरकारच्या ग्राम स्वराज अभियानांतर्गत ज्या सात योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळणार आहे, त्यामाध्यमातून ग्रामस्थ समृद्ध होण्यास मदत होणार आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीने या योजनांचा लाभ घ्यावा. कुणीही उघड्यावर शौचास बसणार नाही याची प्रत्येकाने शपथ घ्यावी आणि स्वच्छतेला महत्व दयावे असे सांगितले. देना बँकेचे अधिकारी मिश्रा यांनी, येरंडी गावात ५६ कुटूंबांकडे बँक खाते नसून त्यांचे बँक खाते या अभियानादरम्यान काढणार असल्याची माहिती दिली.गावातील २४६ कुटूंबांकडे गॅस कनेक्शन असून ९३ कुटूंबांना गॅस कनेक्शनचे वाटप या अभियानादरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार भंडारी यांनी दिली. गावातील एक बालक बाहेरगावी असल्यामुळे लसीकरणापासून वंचित आहे, त्याचेही लवकरच लसीकरण करण्यात येईल. त्यामुळे मिशन इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजय राऊत यांनी सांगितले. यावेळी वीज वितरण कंपनीने सौभाग्य योजनेअंतर्गत १९ कुटूंबांना वीज जोडणी तर उजाला योजनेंतर्गत ग्रामस्थांनी २८ एलईडी बल्ब खरेदी केल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री.लिमजे यांनी दिली.प्रास्ताविक गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मांडले. संचालन विस्तार अधिकारी अनुप भावे यांनी केले. आभार विस्तार अधिकारी आर.डी.वलथरे यांनी मानले. कार्यक्र माला येरंडी येथील प्रतिष्ठीत नागरिक, ग्रामस्थ, तालुक्यातील विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी-कर्मचारी, सर्व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.गावकऱ्यांशी संवाद व भूमिपूजनयावेळी नोडल अधिकारी नाईक व राजेंदर कुमार यांनी गावकºयांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व केंद्र सरकारच्या सात योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच नाईक व राजेंदर कुमार यांनी हेमराज रामटेके या लाभार्थ्याच्या घरी जावून आवास योजनेच्या घरकुलाचे तर धीरज पंचभाई या लाभार्थ्याच्या घरी शौचालय बांधकामाचे भूमिपूजन केले.