शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

शिक्षकांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांना साकडे

By admin | Updated: October 17, 2015 02:33 IST

गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध समस्या मार्गी लावण्यात याव्या यासाठी ...

कास्ट्राईबचे निवेदन : सीईओ, एसडीओंना भेटले संघटनेचे शिष्टमंडळबोंडगावदेवी : गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध समस्या मार्गी लावण्यात याव्या यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा गोंदियाच्या वतीने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले. तसेच अर्जुनी येथे उपविभागीय अधिकारी के.एन.के. गाव यांना निवेदन देण्यात आले.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथील जि.प. व प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ओमप्रकाश वासनिक यांच्याकडे जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. वासनिक यांनी अध्यक्षपदाची धूरा स्विकारताच जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळामधील शिक्षकांच्या गेल्या कित्येक दिवसापासूनच्या प्रलंबित असलेल्या समस्या विनाविलंब सोडविण्याच्या हेतूने कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतिश बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून समस्यावर चर्चा केली. कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने मुकाअ यांना दिलेल्या निवेदनानुसार प्राथमिक विभागाची बिंदू नामावली निश्चित करण्यात यावी, पदोन्नती सेवाज्येष्ठता यादी प्रकाशित व्हावी, माध्यमिक मुख्याध्यापकांची शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, प्राथमिक उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुखाची रिक्त पदे भरण्यात यावी, मासिक वेतन दर महिन्याच्या एक तारखेला देण्यात यावे, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची पदे भरण्यात यावी.अर्जुनी मोरगाव पं.स. कार्यालयात वित्त व जिपीएफ विभागात लिपिकाची नियुक्ती करावी, सहाव्या वेतन आयोगाचा थकबाकीचा शेवटचा हप्ता जाम करण्यात यावा, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी शिक्षण समितीवर नियुक्त करावा, संगणक परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ थांबविण्यात येवू नये. शिक्षकांना उच्च परीक्षेला बसण्याची परवानगी वेळेच्या आत देण्यात यावी, के.एम. मेश्राम, डी.एस. कापगते, ए. बैस या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजित शाळेतून वेतन काढण्यात यावे, जि.प. सर्व शाळा व कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान प्रास्ताविकाचे छायाचित्र लावण्यात यावे. जिल्हा नक्षलग्रस्त असल्यामुळे १५ टक्के नक्षल भत्ता लागू करण्यात यावा, अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करण्यात यावा, कास्ट्राईब शिक्षक संघटनेला दर तीन महिन्याने समस्या संदर्भाने बैठकीसाठी पाचारण करण्यात यावे, शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नियमित घेण्यात यावे आदी मागण्यांच्या संदर्भाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गावडे यांच्या दालनात संघटनेच्या वतीने एक शिष्टमंडळ भेटून समस्या संबंधी चर्चा केली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्य. अधिकारी जयंत पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम, मुख्य लेखा वित्त अधिकारी आर.एम. चव्हाण, प्रभारी उपशिक्षणाधिकारी निलकंठ शिरसाटे उपस्थित होते. या चर्चेत कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सतिश बन्सोड, सुरेंद्र भैसारे, जयंत रंगारी, जी.पी. रामटेके, पुनेकर मेश्राम, एस.डी. महाजन, विनोद बडोले, पी.एन. जगझापे, आर.डी. साखरे, ए.बी. मेश्राम, तेजराम गेडाम, दिलीप मेश्राम व कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. (वार्ताहर)