शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

गोंदियात गॅस सिलिंडरचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 20:18 IST

घरगुती वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरमधून गॅस काढून तो मोकळ्या जागेत त्याचा काळाबाजार करणे सुरू होते. याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी सदर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.

ठळक मुद्देअरविंद गॅस एजन्सीचा प्रकार : १५ लाखाच्या मालासह १२ जणांवर गुन्हा दाखल, मोठी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराच्या गणेशनगरातील अरविंद गॅस एजन्सी गणेशनगर यांच्या गॅस गोदामातून आणलेले सिलिंडर बसंतनगरातील अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सिलिंडरमधील गॅस काढून काळ्या बाजारात विक्री केले जात होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येथे धाड टाकून गुरूवारी (दि.१६) कारवाई केली.घरगुती वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरमधून गॅस काढून तो मोकळ्या जागेत त्याचा काळाबाजार करणे सुरू होते. याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी सदर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धाड घालून निक्कू लिल्हारे रा.बसंतनगर हा एच.पी.गॅसच्या सिलिंडरमधून इलेक्ट्रीक मोटारच्या सहाय्याने गॅस काढून तो खाली सिलिंडरमध्ये भरत होता. या ठिकाणी अरविंद गॅस एजेंन्सीचे तीन वाहन पकडण्यात आले.एमएच ४६ डी.५८७२ यावर चालक विकेश सुरेश फुंडे रा.संजयनगर, आकाश गणेश शेंडे, रा.शास्त्री वॉर्ड गोंदिया, वाहन क्रमांक एमएच ३५ के. ४९५९ चा चालक राजू हिरालाल भोंगाडे रा. संजयनगर त्याचा मदतनिस राहूल यशवंत बागडे रा. संजयनगर, विनोद कारूदास बोरकर रा. गोरेगाव, वाहन एमएच ३५ एजे १२७३ चा चालक महेंद्र दुर्गाप्रसाद शिवणकर रा. गोंदेखारी, त्याचा मदतनिस राजू गोविंदा नेवारे रा.श्रीनगर गोंदिया, सोनू मेथीलाल सिंधीमेश्राम रा.मुंडीपार तसेच निकू लिल्हारे याचे कामगार प्रदीप शरद मेंढे, रा.छोटा गोंदिया, इंद्रकुमार नारंगीलाल नागपुरे रा. गणेशनगर गोंदिया या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत तीन वाहन, १२० सिलिंडर, दोन इलेक्ट्रीक मोटार, इलेक्ट्रीक मोटारला जोडलेले ४ रेग्यूलेटर पाईप, दोन वजन काटे असा एकूण १४ लाख ८१ हजार ४९६ रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, सुखदेव राऊत, विजय रहांगडाले, लिलेंद्र बैस, चंद्रकांत कर्पे, भूवनलाल देशमुख, भुमेश्वर जगनाडे, मधुकर कृपान, चित्तरंजन कोडापे, रेखलाल गौतम, विनोद गौतम यांनी केली आहे.हिरडामालीच्या गोदामातून सिलिंडर आणल्याची माहिती४पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची विचारपूस केली असता जप्त केलेले सिलिंडर अरविंद गॅस एजेंन्सी गणेशनगरचे गोदाम हिरडामाली येथे आहे. त्या गोदामातून हे सिलिंडर आणून बसंतनगरात काळाबाजार केला जात असल्याचे सांगितले. जिल्हा पुरवठा निरीक्षक वैभव तोंडे व स्थानिक गुन्हे शाखा ही कारवाई केली. अत्यावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काळाबाजार करणाºयांची माहिती द्या४जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुरविण्यात येणाºया अत्यावश्यक साहित्याचा कुणी काळाबाजार करीत असेल तर त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष यांना माहिती द्यावी असे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या