राजीव फुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या माल्ही गावात मागील काही दिवसांपासून गावकऱ्यांना गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे नगर परिषद प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.आमगाव नगर परिषदेच्या हद्दीतील माल्ही गावात बाघ नदीतील पात्रात विहीर तयार करण्यात आली. सदर विहिरीतील पाणी पंपाद्वारे माल्हीतील प्रत्येक वॉर्डाला एक दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागीेल काही दिवसांपासून गावकऱ्यांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याची माहिती नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीतील गाळाचा उपसा अद्यापही करण्यात आला नाही. तर पाईप लाईनची सुध्दा दुरूस्ती न केल्याने नालीमधील पाणी नळाच्या पाईप लाईनमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाईप लाईन व पाणी टाकी तयार करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि तांत्रीक बाबीकडे दुर्लक्ष केल्याने ही योजना गावकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.माल्ही येथील लोकसंख्या अडीच हजारावर असून अद्यापही गावकºयांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माल्ही येथील रस्ते, नाली, गटारे आदींची दैनिय अवस्था झाली आहे. दूषीत व गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना विविध आजरांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर समस्येची प्रशासनाने अद्यापही दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी याची गांर्भियाने दखल घेवून ही समस्या मार्गी लावण्याची मागणी गोकुल कोरे, सुरेश शेंडे, दिनेश शेंडे,राजेश शेंडे, देवचंद धानोरकर, विनोद पाथोडे, जयेंद्र मेंढे, अजय कागदीमेश्राम, योगेश कोरे, रामू शेंडे व गावकºयांनी केली आहे.गावकºयांना पुरवठा करण्यात येत असलेले पाणी दूषीत व गढूळ आहे. यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात न.प.मुख्याधिकाºयांकडे तक्रार केली. मात्र त्यांनी याची दखल घेतली नाही.- प्रशांत कोरे, सामाजिक कार्यकर्ता.
माल्ही येथे गढूळ पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:21 IST
येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या माल्ही गावात मागील काही दिवसांपासून गावकऱ्यांना गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे नगर परिषद प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.
माल्ही येथे गढूळ पाण्याचा पुरवठा
ठळक मुद्देन.प.चे दुर्लक्ष : गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात