शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
3
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
4
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
5
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
6
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
7
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
8
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
9
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
10
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
11
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
12
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
13
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
14
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
20
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास

मोकळ्या जागेत खड्डा खोदून टाकण्यात आला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 5:00 AM

गणेशनगरवासीयांना कचऱ्यापासून सुटका मिळाली याचा आनंद होता. मात्र गुरुवारी (दि.१८) दुपारी गणेशनगर परिसरातील रामानी फ्लॅट स्कीमच्या मागे मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात डिस्पोजेबल, लग्नातील शिळे अन्न, तसेच मेलेल्या वराहाला टाकण्यात आले व खड्डा बुजविण्यात आला नाही. त्यानंतर कुत्र्यांनी तेथे धुडघूस घातला. परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रासले आहेत. नगर परिषदेचे हे कृत्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, यानंतर मात्र त्यांचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विशेष सभेत झालेल्या निर्णयानंतर नगर परिषदेने आता मोक्षधाम परिसरात कचरा टाकणे बंद केले आहे. मात्र असे असतानाच गुरुवारी (दि.१८) गणेशनगर परिसरातील रामानी फ्लॅट स्कीमच्या मागे मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात लग्नातील शिळे अन्न व मेलेल्या वराहाला टाकण्यात आले आहे. त्यातून पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नगर परिषदेने हे कृत्य केले असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, गणेशनगरवासीयांत पुन्हा एकदा रोष निर्माण झाला आहे. मोक्षधाम परिसरात टाकला जात असलेला कचरा व त्याला आग लावल्याने निघणाऱ्या धुरापासून गणेशनगर व परिसरातील अन्य वसाहतींमधील नागरिक त्रासले होते. यावर नागरिकांनी एकत्र येऊन नगर परिषदेवर मोर्चा काढला होता. नागरिक व नगर परिषदेचा हा लढा चांगलाच वाढल्याने नगर परिषदेने यावर तोडगा काढण्यासाठी मोक्षधाम परिसरात कचरा टाकणे बंद केले आहे. एवढेच नव्हे तर बुधवारी (दि.१७) घेण्यात आलेल्या विशेष सभेत शहरातील कचरा टाकण्यासाठी पिंडकेपार परिसरात जागा घेण्याचे ठरले होते. यामुळे गणेशनगरवासीयांना कचऱ्यापासून सुटका मिळाली याचा आनंद होता. मात्र गुरुवारी (दि.१८) दुपारी गणेशनगर परिसरातील रामानी फ्लॅट स्कीमच्या मागे मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात डिस्पोजेबल, लग्नातील शिळे अन्न, तसेच मेलेल्या वराहाला टाकण्यात आले व खड्डा बुजविण्यात आला नाही. त्यानंतर कुत्र्यांनी तेथे धुडघूस घातला. परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रासले आहेत. नगर परिषदेचे हे कृत्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, यानंतर मात्र त्यांचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे.

नागरिकांनी केली संबंधितांवर कारवाईची मागणी - गुरुवारी टाकण्यात आलेल्या कचऱ्यात लग्नातील शिळे अन्न व डिस्पोजेबल आहे. सोबतच ३ मेलेले वराह असल्याने हे नगर परिषदेचेच काम असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, हा विषय सध्या चर्चेचा बनला आहे. एकीकडे कचरा टाकण्यासाठी पिंडकेपार येथे जागेची व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर कोठेही कचरा टाकला जात असल्याने नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला असून, संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

 

टॅग्स :dumpingकचरा