शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

एलसीबीने पकडली घरफोडी करणारी टोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:56 IST

शहरातील घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ आॅक्टोबर रोजी पकडली. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली. या आरोपीकडून ८ लाख २० हजार रूपये किंमतीचे ३२.५ तोळे सोने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी मंगळवारी (दि.९) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देनऊ गुन्हे उघडकीस : ३२.५ तोळे सोने जप्त, आरोपी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ आॅक्टोबर रोजी पकडली. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली. या आरोपीकडून ८ लाख २० हजार रूपये किंमतीचे ३२.५ तोळे सोने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी मंगळवारी (दि.९) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.रोहन अविनाश नागज्योती (१९) रा. यादव चौक गोंदिया, बबन सुरेश भागडकर (२०) रा. मरारटोली रेल्वे फाटकजवळ गोंदिया, मनिष विजय राय (२५) रा. सतनामी मोहल्ला सरकारी तलावजवळ गोंदिया व समशेर अन्सार मलीक (४१) रा.श्रीनगर गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.सदर आरोपींनी गोंदिया शहर, रामनगर व गोंदिया ग्रामीण या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १३ ते १४ घरफोड्या केल्याची कबुली सदर आरोपींनी दिली. पोलिसांकडे ९ प्रकरणे दाखल असल्यामुळे त्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. २२ ते २३ आॅगस्ट २०१८ च्या रात्री रेलटोलीच्या बापट लॉन रस्त्यावरील निखिल रूपारेल यांच्या घरून या आरोपींनी ८ लाख २० हजार रूपये किंमतीचे ३२.५ तोळ्याचे दागिणे चोरून नेले होते. यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे आले होते. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले. स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीचे १८ गुन्हे, मोटारसायकल चोरीचे ११ गुन्हे, चोरीचे ९ गुन्हे असे ३८ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. चोरीचे दागिणे विक्री करण्यासाठी आलेल्यांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी. आणि जो व्यक्ती चोरीचे दागिणे घेईल त्यांच्याविरूध्द कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक बैजल यांनी सांगितले.३० हजाराचा पुरस्कारसदर कारवाई केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेला पोलीस अधीक्षकांनी १५-१५ हजाराचे दोन असे ३० हजाराचे पुरस्कार जाहीर केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, प्रमोद बघेले, कर्मचारी विनय शेंडे, तुलसीदास लुटे, सुखदेव राऊत, गोपाल कापगते, भूवनलाल देशमुख, मधुकर कृपाण, विजय रहांगडाले, रेखलाल गौतम, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, अजय रहांगडाले, राजेश बढे, भुमेश्वर जगनाडे, भागवत दसरीया, चंद्रकांत कर्पे, सुजाता गेडाम, पंकज खरबडे, गौतम यांचा समावेश आहे.

टॅग्स :PoliceपोलिसThiefचोर