शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगारास केले जिल्ह्यातून हद्दपार, गंगाझर पोलिसांची कारवाई

By कपिल केकत | Updated: February 16, 2024 20:21 IST

सहा महिन्यांसाठी हद्दपारीचे आदेश

गोंदिया : विविध गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी गंगाझरी पोलिसांनी केलेल्या कारवाईला यश आले असून,उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आदेश काढून या सराईत गुन्हेगाराला जिल्ह्यातून सहा महिन्यांच्या कालावधीकरिता हद्दपार केले आहे.

गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम कोहका येथील रहिवासी सराईत गुन्हेगार आकाश सुशील कनसरे (२२) याच्याविरुद्ध गंगाझरी पोलिस ठाण्यात अवैध दारू विक्री, भांडण, मारहाण, दंगा करणे, जबरीने इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, गृह अतिक्रमण, विनयभंग, धमकी देणे, अशाप्रकारचे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. आकाश कनसरेवर गंगाझरी पोलिसांनी वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा त्याच्या चारित्र्य आणि सवयीत कसलीही सुधारणा झाली नाही. उलट तो मगरूर व धाडसी प्रवृत्तीचा असल्याने परिसरातील लोकांच्या मनात दहशत निर्माण होऊन त्याच्या कृतीमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली होती. अशात गंगाझरी पोलिस निरीक्षकांनी त्याला जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याकरिता महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (१),(अ),(ब) अन्वये उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पर्वणी पाटील यांच्याकडे मंजुरीस्तव प्रस्ताव सादर केला होता.

 

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पाटील यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांनी विहित मुदतीत प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून आकाश कनसरे या जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती. अखेर पाटील यांनी ९ फेब्रुवारी रोजी आदेश काढून आकाश कनसरे याला सहा महिन्यांच्या कालावधीकरिता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.

हद्दपारीच्या कारवायांमुळे गुन्हेगारांत दहशत- पोलिस अधीक्षक पिंगळे रुजू झाल्यापासून त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी थेट हद्दपारीच्या कारवाया सुरू केल्या आहेत. यातूनच गंगाझरी पोलिसांनी आकाश कनसरेवर हद्दपारीची कारवाई करून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळवून दिला. पोलिसांकडून होत असलेल्या हद्दपारीच्या कारवायांमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्य व अवैध धंद्यांपासून परावृत्त होऊन इतर वैध रोजगाराकडे वळावे अन्यथा हद्दपारीच्या कारवाया सुरूच राहतील, असे पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी कळविले आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया