शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

रेल्वे प्रवाशांच्या पर्स, बॅग पळविणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 05:00 IST

गोंदिया लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत हावडाकडून येणाऱ्या मेल एक्स्प्रेसमधील आरक्षित डब्यात रेल्वे प्रवाशांचे लेडीज पर्स, सोन्याचे दागिने व रोख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर यांना गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. रेल्वे पोलीस ठाणे गोंदिया येथे भादंविच्या कलम ३९२, ३४ गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार दीपक डोर्लीकर व पथक कार्यरत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेल्वे मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या एक्स्प्रेसमधील रेल्वे प्रवाशांच्या लेडीज पर्स चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय (आसाम) टोळीस स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई २४ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. या प्रकरणात दोन आरोपीकडून १० लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.गोंदिया लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत हावडाकडून येणाऱ्या मेल एक्स्प्रेसमधील आरक्षित डब्यात रेल्वे प्रवाशांचे लेडीज पर्स, सोन्याचे दागिने व रोख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर यांना गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. रेल्वे पोलीस ठाणे गोंदिया येथे भादंविच्या कलम ३९२, ३४ गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार दीपक डोर्लीकर व पथक कार्यरत होते. तपासादरम्यान घडलेल्या गुन्ह्याचा सखोल अभ्यास करून रेल्वे प्रवासी गाड्यांचे रिझर्व्हेशन चार्ट, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुराव्याचे विश्लेषण करून आरोपी नोगाव (आसाम) येथील असल्याचे बाब पुढे आली. आरोपी नयनमुनी चंद्रकांता मेधी (२६), दीपज्योती चंद्रकांता मेधी (२२), संजू रामनारायण राय (२८), सर्व रा. डबोका, नोगाव आसाम यांना सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. त्यांनी रेल्वे प्रवासी गाडीच्या एसी कोचमध्ये रिझर्व्हेशन करून रेल्वे प्रवाशांच्या लेडीज पर्स चोरी केल्याचे कबुली दिली. त्यांना गुन्ह्यात अटक केली आहे. आरोपीजवळून ६ लाख ८६ हजार ४०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने वितळवून केलेली सोन्याची लगड वजन १४३ ग्रॅम किंमत १ लाख ४८ हजारांचे सोन्याचे दागिने, सोन्याची दुसरी लगड वजन ४११९० ग्रॅम किंमत १ लाख २० हजार ३८३ रुपये, आठ नग सोन्याचा बांगड्या वजन ३० ग्रॅम, रेल्वे पोलीस ठाणे गोंदिया येथील एका दुसऱ्या गुन्ह्यातील भादंविचे कलम ३७९, ३४ अंतर्गत १ लाख ५ हजार ६०० रुपयांचे दागिने वितळवून केलेली सोन्याची लगड वजन २२ ग्रॅम जप्त केली. या आरोपींकडून १० लाख ६० हजार ३८३ रुपये किमतीचा माल आरोपींकडून जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार दीपक डोर्लीकर, रवींद्र सावजी यांनी केली.

 

टॅग्स :railwayरेल्वेThiefचोर