बेमुदत आंदोलन : तांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभागगोंदिया : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी विभागाच्या तांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देत धरणे दिले.त्यामुळे जिल्हाभरातील कृषी कार्यालयांमध्ये सोमवारपासून शुकशुकाट दिसून आला. ऐन शेतीच्या कामांची लगबग असताना हे आंदोलन सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.कृषी विभागातील तांत्रिक संवर्गात येणाऱ्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग-२, वर्ग-१, अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी सहसंचालक, कृषी संचालक या संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. त्यांचे आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांना दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या जिल्हा शाखेचे पदाधिकारी ए.एम.कुरील, ए.एम.कोटांगले, सी.डी.कोल्हे, गणेश चौधरी, प्रकाश मेश्राम, आय.बी.बागडे, आशा रामटेके, डी.के.ठाकूर, आर.आर.लिल्हारे, प्रतिभा राऊत, युवराज शहारे, दुर्गाप्रसाद वाहाणे, पद्माकर गिदमारे, पी.एस.मेंडे, आर.के.चांदेवार, धनाजी संग्रामे, रवी भगत, घनश्याम चौधरी आदी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)
कृषी विभागातील कामकाज ठप्प
By admin | Updated: August 12, 2014 23:49 IST