शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
3
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
4
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
5
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
6
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
7
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
8
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
9
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
10
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
11
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
12
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
13
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
15
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
16
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
17
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
18
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
19
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
20
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

मोर्चे, रॅली काढून नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:13 IST

शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही बुधवारी (दि.३) मोर्चे, शांती मार्च आणि रॅली काढून भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच या घटनेस जबाबदार असणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

ठळक मुद्देदोषींवर कठोर कारवाई करा : ग्रामीण भागात उमटले पडसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही बुधवारी (दि.३) मोर्चे, शांती मार्च आणि रॅली काढून भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच या घटनेस जबाबदार असणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.गोरेगावात निषेध मोर्चागोरेगाव : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेर्धात फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या वतीने बुधवारी (दि.३) ठाणा रोड चौक ते तहसील कार्यालयपर्यंत निषेध रॅली काढण्यात आली.या घटनेस जबाबदार असणाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीचे निवेदन तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांना देण्यात आले. त्यानंतर येथील मुख्य बसस्थानकाजवळ सभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी आंनद चंद्रिकापुरे, सचिन नांदगाये, विकास साखरे, डॉ.एल.एस.तुरकर, दिवाकर जांभुळकर, राहुल चंद्रिकापुरे, भूमेश्वर साखरे, मुकेश चौधरी, भीमराव साखरे, विलास बौध्द, संजय कोचे, प्रितीराज मेश्राम, आदेश थुलकर, जितेद्र डोंगरे, शैलेश डोंगरे, प्रमिला शहारे, निरंजन साखरे, राकेश डोंगरे, रोहीत साखरे, मनमित साखरे, विशाल नंदेश्वर, दिनेश वैद्य, एस.बी.टेंभुर्णीकर उपस्थित होते.आमगाव तणावपूर्ण शांतताआमगाव : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेर्धात विविध संघटनानी बुधवारी (दि.३) बंदचे आवाहन केले होते. याला आमगाव येथे चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाणे आणि शाळा व महाविद्यालये बंद होते. या दरम्यान शहरात तणावपूर्ण शांतता होती. आमगाव येथे विविध आंबेडकरी संघटना व काही राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरुन भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविला. येथील डॉ. आंबेडकर चौकात एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अपर्ण केली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मागण्यांचे निवदेन तहसीलदारांना देण्यात आले.भीमा कोरेगाव भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेधअर्जुनी-मोरगाव : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे २०० व्या शौर्य दिना दरम्यान झालेल्या घटनेच्या निषेर्धात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला. अर्जुनी-मोरगाव येथे लोकशाही सामाजिक संघटना, समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा व शेकडो दलित बांधवाच्या उपस्थित मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. येथील बौध्द विहारातून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करुन निषेध मोर्च्याला सुरुवात झाली. हा मोर्चा शांततेत शहराच्या प्रमुख मार्गावरुन तहसील कार्यालयावर नेण्यात आला. या वेळी नायब तहसीलदार पाटील व वाढई यांना निवेदन देण्यात आले. भीमा कोरेगाव येथे दलित बांधवावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण राज्यभर संतापाची लाट आहे. भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन व ज्या दलित समाज बांधवाचे जे आर्थिक नुकसान झाले त्यांना शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.अर्जुनी-मोरगाव येथील निषेध मोर्च्यात झरपडा, बोंडगावदेवी, महागाव, इटखेडा, नवेगावबांध यासह विविध गावातील बौध्द समाजबांधव सहभागी झाले होते.देवरीत शंभर टक्के बंददेवरी : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (दि.३) देवरी येथे शंभर टक्के बंद ठेवण्यात आला. शहरातील व्यापाºयांनी आपली पूर्ण प्रतिष्ठाणे बंद ठेवली. शाळा संचालकांनी आपली शाळा व महाविद्यालय पूर्णत: बंद ठेवली होती. येथील मुलगंध कुटी बौध्द विहारातून बौध्द समाजबांधवानी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार विजय बोरुडे यांना दिले. या घटनेस जबाबदार असणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात प्राचार्य के.सी. शहारे, न.प. उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, जि. प. सदस्य उषा शहारे, रुपचंद जांभुळकर, मनोज साखरे, मधुकर साखरे, अमित तरजुले, ललीत भैसारे, सुभाष टेंभुर्रकर, प्रशांत मेश्राम, मनोज नंदेश्वर, सुरेंद्र बन्सोड, सुधीर दहिवले, प्रदीप शहारे, नितीन वालदे, पृथ्वीराज नंदेश्वर, प्रशांत कोटांगले, निलेश राऊत,निलध्वज आकरे, सी. बी. कोटांगले, दिपक राऊत, मधुकर शहारे, कपील बडोले, जगदिश टेंभुर्णे यांचा समावेश होता. तहसील कार्यालय परिसरात मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. या वेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले.इसापूर येथे निषेध सभाइसापूर : येथील बौध्द समाज बांधवाच्या वतीने भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. या बंदला गावातील संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने, शाळा यांनी बंद ठेवून सहकार्य केले. यावेळी सभा घेवून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. जनार्धन मेश्राम, राजेश लोणारे, प्रकाश देशपांडे, मोरेश्वर गोंडाणे, सिध्दार्थ सुखदेवे, माणिक गडपाल उपस्थित होते.नवेगावबांध येथे शांती मार्चनवेगावबांध : १ जानेवारीला पूणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्ताने क्रांती शूरविरांना अभिवादन करण्यासाठी विजयस्तंभाकडे जाणाºया आंबेडकरी अनुयायावर समाजकंटकानी दगडफेड करुन त्यांच्या वाहनाची तोडफोड व जाळपोळ केली.या घटनेच्या निषेधार्थ येथील नगर बौध्द समाजाच्या वतीने नवेगावबांध बंद व शांती मार्च काढून निषेध नोंदविण्यात आला. येथील बाजारपेठ, व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. नगर बौध्द समाजाच्या वतीने प्रशिक बुध्दविहारातून शांती मार्च काढण्यात आला. भीमा कोरेगाव येथील घटनेचा तिव्र निषेध नोंदविण्यात आला. या वेळी विविध मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे ठाणेदार स्वप्नील उजवणे यांना देण्यात आले. शिष्टमंडळात सुरेंद्र सरजारे, निषेद शहारे, रमेश राऊत, सरपंच अनिरुध्द शहारे, माजी जि.प.सदस्य विशाखा साखरे, समता सैनिक दलाचे हेमचंद लाडे, भिमा शहारे सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन राऊत, भाष्कर बडोले, रेवचंद शहारे, राजेंद्र साखरे यांचा समावेश होता.पांढरी येथे काढली रॅलीपांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील भिमसैनिकांनी रॅली काढून खमाटा चौक ते रेल्वे स्टेशन वरील सर्व दुकाने, शाळा बंद केले. भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविला.रॅली काढून नोंदविला निषेधसालेकसा : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी राज्यभरात बंदचे आवाहन केले होते. सालेकसा तालुक्यातील शाळा महाविद्यालय आणि बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. दुपारी १२ वाजता सालेकसा येथील फुले नगरातून रॅली काढून भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. रॅलीचे नगर भ्रमण करीत तहसील कार्यालयात पोहचली. शिष्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रशांत सांगळे यांना देण्यात आले. रॅलीमध्ये नागार्जुन बौध्द विहार समिती, ओबीसी कृती समिती, महात्मा फुले स्मारक समिती, रमाई स्मारक समिती प्रेरणा मित्र परिवार आदी संघटनाचा समावेश होता.शेंडा कोयलारी येथे मोर्चाशेंडा-कोयलारी : शेंडा येथील आंबेडकरी समाजबांधवानी मोर्चा काढून भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदविला. १ जानेवारीला भीमा कोरेगाव (पुणे) येथे शौर्य दिनाच्या कार्यक्रमासाठी लाखो आंबेडकरी समाजबांधव मानवंदना देण्यासाठी एकत्र आले असता काही समाजकंटकानी त्यांच्यावर दगडफेक केली. घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.तिरोड्यात निघाला मोर्चातिरोडा : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेर्धात शहरात मोर्चा काढण्यात आला. तिरोडा पोलीस स्टेशनपासून मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी तिरोडा येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मोर्चात आंबेडकरी व बहुजन समाजबांधव सहभागी झाले होते. माजी आ. भजनदास वैद्य, माजी आ. दिलीप बंसोड, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, प्रिती रामटेके, प्रकाश गेडाम, नंदागवळी, के.के.वैद्य, अजय वैद्य, सुधीर मेश्राम,व्ही.डी.मेश्राम, अ‍ॅड. नरेश शेंडे, मोरेश्वर डहाटे, माजी जि.प.सदस्य शशिकला मेश्राम, पंचशिला वासनिक यांनी मोर्च्याचे नेतृत्व केले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात एकत्रित होवून अतुल गजभीये यांच्यासह १२ समाजबांधव भीमा कोरेगाव येथील घटनेची सविस्तर माहिती दिली.

 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव