शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
5
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
6
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
7
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
8
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
9
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
10
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
11
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
12
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
13
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
14
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
15
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
16
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
17
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
18
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
19
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
20
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!

भरकटलेल्या पावलांना सावरतेय ‘मैत्री’

By admin | Updated: September 14, 2016 00:22 IST

आपल्या पाल्यांच्या मनात येणाऱ्या वाईट विचारांमुळे आपण त्रस्त आहात? आपला मुलगा, मुलगी संकुचित वृत्तीमुळे आपल्याशी बिनधास्त बोलू शकत नाही?

१८८७ जणांचे समुपदेशन : ९५२ किशोर व ९३५ किशोरींचा समावेशनरेश रहिले गोंदियाआपल्या पाल्यांच्या मनात येणाऱ्या वाईट विचारांमुळे आपण त्रस्त आहात? आपला मुलगा, मुलगी संकुचित वृत्तीमुळे आपल्याशी बिनधास्त बोलू शकत नाही? आपण त्यांच्या भविष्याला घेऊन चिंताग्रस्त आहात? या प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असतील तर काळजीचे कारण नाही. त्या बालकांच्या शंका-कुशंकांचे समाधान करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने समुपदेशन ‘मैत्री’ संवाद केंद्र कार्यरत झाले आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाव्यतिरिक्त जिल्हाभरातील किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्याचे समाधान या ‘मैत्री’तून केले जात आहे. आतापर्यंत यातून १८८७ मुलामुलींचे समुपदेशन केल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या ‘मैत्री’ संवाद केंद्रात या प्रकारच्या समस्येने ग्रस्त मुले-मुली दाखल होतात. बालकांच्या विक्षिप्त कृत्याची तक्रार शिक्षक-पालकांकडून केली जाते. परंतु त्यात चुक त्या मुला-मुलींची नसते. वाढत्या वयासोबत त्यांच्यात शारीरिक व मानसिक बदल होतात. या बदलाला सांभाळताना अनेक समस्या येतात. या समस्येचे योग्य समाधान करण्यासाठी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास ते स्वत:च समस्यांचे समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात. यातून ते चुकीच्या मार्गावरही जातात. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात १० ते १९ वर्षातील मुला-मुलींसाठी ‘मैत्री’ संवाद व सेवा केंद्र सुरू करण्यात आले. बाई गंगाबाई महिला रूग्णालय मध्ये गुरुवार, तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात बुधवारी व देवरीच्या ग्रामीण रूग्णालयात शुक्रवारी ही सेवा दिली जात आहे.वेळेवर मार्गदर्शन गरजेचे किशोरवयीन बालकांच्या समस्येवर वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. बालकांच्या समस्या समाधानासाठी ‘मैत्री’ संवाद केंदाकडून आश्रमशाळा, झोपडपट्टी परिसर, शाळांमध्ये मार्गदर्शन केले जाते. बालकांच्या समस्यांना घेऊन काही पालक व शिक्षक ‘मैत्री’ संवाद केंद्रात येतात. परंतु बालक आपल्या पाल्यांसामोर मनमोकळ्या पणाने बोलत नाहीत. अश्यावेळी त्या बालकांसोबत एकट्यात बोलले जाते. किंवा आपल्या समस्या कागदावर लिहून दिले जाते. १८८७ मुले-मुली योग्य मार्गावरअर्श कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते आॅगस्ट अखेरपर्यंत १८८७ मुला-मुलींना ‘मैत्री’ संवाद केंद्रातून मार्गदर्शन करण्यात आले. यात ९५२ किशोर व ९३५ किशोरींचा समावेश आहे. आॅगस्ट महिन्यात २६० युवक व २४२ युवतींना या केंद्राच्या माध्यमातून चांगल्या मार्गावर आल्या. एप्रिल ते आॅगस्ट अखेर जिल्हा सामान्य रूग्णालयात ७४४, महिला रूग्णालय ५१६ तिरोडा उपजिल्हा रूग्णालय २८८, देवरी ग्रामीण रूग्णालयात ३९९ युवक-युवतींना मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे होतात समस्या किशोरवयीन मुला-मुलींच्या हातात आता स्मार्ट फोन आला आहे. इंटरनेटचा सर्रास होत असलेला वापर, टी.व्ही. चॅनलवर जे दाखवायला नको ते दाखविले जाते. त्यामुळे वाटईट कृत्य करण्याचा प्रयत्न प्रौगंडावस्थेतील मुले-मुली करतात.यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. शाळांमध्येही या प्रकारच्या समस्या वाढत आहेत. बालके प्रौढ व्यक्तीसारखा व्यवहार करतात. या प्रकरातून लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर येतात.‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून किशोर-किशोरी यांना शारीरिक, मानसिक व लैंगिक आरोग्यासंदर्भात माहिती दिली जाते. मोफत हिमोग्लोबीन, रक्त व सिकलसेल तपासणी करण्यात येते. विवाह पूर्व मार्गदर्शन, आहार विषयक मार्गदर्शन व रक्ताची कमतरता यावर उपचार केला जातो. मुलींना मासिक धर्म आजारासंदर्भात माहिती दिली जाते. प्रजनन व लैंगिक आजारासंबंधी प्रतिबंधक आरोग्य शिक्षण व उपाय योजना केली जाते. हे सर्व गुप्त ठेवले जाते.