मित्राचा खून करणाऱ्याची तुरुंगात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:49+5:302021-06-17T04:20:49+5:30

गोंदिया : मोबाईल घेण्यावरून आपसात झालेल्या भांडणातून मित्रानेच मित्राला दगडाने ठेचून ठार मारल्याची घटना रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत बंगाली शाळेजवळ ...

Friend's murderer sent to jail | मित्राचा खून करणाऱ्याची तुरुंगात रवानगी

मित्राचा खून करणाऱ्याची तुरुंगात रवानगी

Next

गोंदिया : मोबाईल घेण्यावरून आपसात झालेल्या भांडणातून मित्रानेच मित्राला दगडाने ठेचून ठार मारल्याची घटना रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत बंगाली शाळेजवळ ९ जून रोजी घडली. या घटनेत बबलू कदीर कुरेशी (३५) रा. गोंदिया याचा मृत्यू झाला. खून करणाऱ्या मुकेश रावते (३०) रा. पुनाटोली गोंदिया याला १० जूनच्या रात्रीच रामनगर पोलिसांनी अटक केली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने आधी १४ जून तर नंतर दोन दिवसाने पीसीआर वाढवून १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने भंडारा येथील तुरुंगात त्याची रवानगी करण्यात आली आहे.

आरोपी मुकेश रावते याने कुरेशी याच्याकडे असलेला मोबाईल मागितला होता. त्यावरूनच त्यांच्यात भांडण झाले होते. मात्र भांडण झाल्यानंतरही ते सोबतच होते व त्यानंतर मध्यरात्री पुन्हा त्यांच्यात भांडण झाले असावे व त्यातूनच रावतेने मोठा दगड कुरेशीच्या डोक्यावर मारून त्याला दगडाने मारून ठार केले. सकाळी लोक उठल्यावर त्यांना कुरेशीचा मृतदेह दिसून आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक वसगडे करीत आहेत.

Web Title: Friend's murderer sent to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.