शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटीचे वारंवार सॅनिटाईजेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करावा लागला होता व त्यामुळे सर्वच काही ठप्प पडले होते. याचा ...

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करावा लागला होता व त्यामुळे सर्वच काही ठप्प पडले होते. याचा फटका राज्य रस्ते परिवहन महामंडळालाही दुसऱ्यांदा सहन करावा लागला असून महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यात जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या आगारांचाही समावेश असून या दोन्ही आगारात एसटी मागील सुमारे दीड महिन्यापासून स्थानकातच उभ्या होत्या. परिणामी दोन्ही आगार कोट्यवधींच्या नुकसानीत गेले आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळले, त्यात प्रवास पूर्णपणे बंद होता. यामुळे एसटी स्थानकात प्रवाशांची वाट बघत उभी राहिली.

आता राज्यातील स्थिती नियंत्रणात येत असल्याचे बघून राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात केली आहे. परिणामी एसटी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली असून हळूवारपणे तिला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आगारांकडून एसटीची धुलाई व सॅनिटाईजेशन केले जात आहे. प्रत्येक फेरीनंतर एसटी आगारात येताच तिची धुलाई व सॅनिटाईजेशन केले जात आहे, हे विशेष.

--------------------------------

जिल्ह्यातील एकूण बसेस - १२१

सध्या सुरू असलेल्या बसेस - ६०

एकूण कर्मचारी- ४७०

वाहक- १५४

चालक- १९८

कामावर येणारे वाहक - १६

कामावर येणारे चालक- २६

------------------------------

नागपूर मार्गावर सर्वाधिक वाहतूक

गोंदिया आगारातील सर्वाधिक फेऱ्या नागपूर मार्गावर धावतात. नागपूर मार्गावर मधात भंडारा जिल्हा येत असून त्यानंतर नागपूर येते. जिल्हा निर्मितीपूर्वी गोंदिया भंडारा जिल्ह्यातच होता व आजही कित्येक कार्यालयांचा कारभार भंडारा येथूनच चालतो. तसेच नागपूर येथे बहुतांश विभागांचे मुख्य कार्यालय असून याशिवाय शिक्षण, उपचार, खरेदी व कार्यालयीन कामकाजासाठी नागरिकांना नागपूर येथे जावे लागते. तसेच अपडाऊन करणारे कर्मचारीही असल्याने वर्षभर या मार्गावर वाहतूक असते. तिरोडा आगाराच्या एसटीही नागपूर तसेच गोंदिया मार्गावर धावत आहेत.

---------------------------------------

प्रत्येक फेरीनंतर एसटीचे सॅनिटाईजेशन

एसटीचा प्रवास सुरू झाला असून प्रवाशांचा हळूवार प्रतिसाद मिळत आहे. अशात आगारांकडून प्रवासी सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. यासाठी प्रत्येक फेरीनंतर एसटीची धुलाई व सॅनिटाईजेशन केले जात आहे. चालक-वाहकांना मास्क बंधनकारक असतानाच प्रवाशांनाही मास्क घालूनच प्रवेश दिला जात आहे. प्रवाशांचा प्रवास सुखद व्हावा असे असतानाच ते सुरक्षित रहावे याकडेही आगारांकडून लक्ष दिले जात आहे.

------------------------------------

सुमारे ५ कोटींचा झाला तोटा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन करावा लागला असून याचा फटका आगारांना चांगलाच बसला आहे. मागील सुमारे दीड महिन्यापासून एसटी स्थानकातच उभी असल्याने गोंदिया आगाराचे या काळात सुमारे ३.५० कोटींचे तर तिरोडा आगाराचेही सुमारे १.५० कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.

------------------------------------

नागरिकांनी प्रवास पूर्णपणे टाळला

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड जीवहानी केली आहे. जिल्ह्यातील ती परिस्थिती बघता आता नागरिकांत दहशत बसली आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळल्याचेही दिसत आहे. अशात नागरिकांनी प्रवासावर पूर्णपणे बंदीच घातली आहे. परिणामी एसटी स्थानकात तयार उभी असतानाही प्रवासी नसल्याने तिला तसेच उभे रहावे लागत असल्याचे दिसले. आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने कामानिमित्त नागरिकांनी बाहेर पडण्यास सुरूवात केली असून थोडाफार प्रतिसाद मिळत आहे.

----------------------------

लालपरी रस्त्यावर निघाल्याने मिळाला दिलासा

मागील सुमारे दीड महिन्यापासून लालपरी स्थानकातच होती. यामुळे आगाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. या लालपरीवरच आमचा उदरनिर्वाह असून आता लालपरी पुन्हा रस्त्यावर निघाल्याने आनंद होत आहे. आमची ड्यूटी पुन्हा सुरू झाली असून आता पगाराचीही समस्या सुटणार.

- अरूण तुरकर (चालक)

----------------------------

लॉकडाऊनमुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मागील वर्षी सुद्धा हीच स्थिती निर्माण झाली होती. एसटी स्थानकातच उभी राहत असल्याने बरे वाटत नव्हते. आता एसटी पुन्हा रस्त्यावर उतरली असून तिचा प्रवास करता येणार आहे. उत्पन्न येणार असल्याने पगाराचा प्रश्नही सुटणार.

- श्यामा मेश्राम (वाहक)