शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

एसटी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास ! ड्रायव्हर, कंडक्टरांना कुटुंबासह करता येणार चार महिने कुठेही प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:09 IST

Gondia : दोन सत्रांसाठी मिळतो फॅमिली पास

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी ज्याप्रमाणे योजना राबविल्या जात आहेत. त्याचप्रमाणे, चालक, वाहकांसाठीही मोफत पासच्या कालावधीत वाढ करण्याचा एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घेतला आहे.

आधी कर्मचाऱ्यांना वर्षभरात फक्त दोन महिने जानेवारी ते जून व जुलै ते डिसेंबर या दोन सत्रांत मोफत प्रवास सुविधा मिळत होती. मात्र, आता ती चार महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आता वर्षभरात चार महिने मोफत फॅमिली पास मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत पास सुविधेत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

विविध कामगार संघटनांच्या मागणीनंतर परिवहन महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना आता वर्षभरात चार महिने मोफत प्रवासाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आता वर्षभरात ४ महिने मोफत फॅमिली पासपहिले सत्र जानेवारी ते जून या कालावधीत एक महिन्याचा पास आणि दुसरे सत्र जुलै ते डिसेंबरमध्ये एक महिन्याचा असा एकूण दोन महिन्यांचा मोफत पास देण्यात येत असे. मात्र, आता एका सत्रात दोन महिने, असे दोन सत्रांमध्ये मिळून चार महिन्यांचा मोफत पास दिला जाणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना राज्यभर प्रवासाची मोठी सवलत मिळेल.

२ महिने महामंडळाकडून परिपत्रक जारीया अगोदार वाहक, चालकांना वर्षभरात केवळ दोन सत्रांत दोन महिने मोफत प्रवास सुविधा मिळत होती. मात्र, आता वर्षभरात चार महिने मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करून दिला जाणार आहे.

पूर्वी किती महिन्यांचा पास मिळायचा?पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना वर्षभरात फक्त दोन महिने जानेवारी ते जून व जुलै ते डिसेंबर या दोन सत्रांत मोफत प्रवास सुविधा मिळत होती. मात्र, आता ती चार महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

ही सुविधा फक्त कर्मचाऱ्यांसाठीमोफत पास सुविधा फक्त एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना राज्यभर प्रवासाची मोठी सवलत मिळणार आहे. यामुळे चालक, वाहक व त्यांच्या कुटुंबीयांना याचा फायदा होणार आहे.

पहिले सत्र : जानेवारी ते जून२ महिने मोफत प्रवासदुसरे सत्र : जुलै ते डिसेंबर२ महिने मोफत प्रवास

दोन सत्रांसाठी मिळतो फॅमिली पासएसटी विभागाकडून आधी जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या दोन सत्रांत दोन महिन्यांचा मोफत पास देण्यात येत असे. मात्र, आता या सुविधेत मोठी सुधारणा करत, एका सत्रात दोन महिने असे दोन सत्रांमध्ये मिळून चार महिन्यांचा मोफत पास दिला जाणार आहे.

 

टॅग्स :gondiya-acगोंदिया