शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

तीन महिने मिळणार मोफत सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी संपूर्ण देशात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. ‘लॉकडाऊन’ च्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यानुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देउज्ज्वला लाभार्थ्यांची सोय : घराबाहेर पडू नका, घरपोच सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांच्या कालावधित जिल्ह्यातील उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येणार आहे.देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी संपूर्ण देशात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. ‘लॉकडाऊन’ च्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यानुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलिंडरचे वाटप करताना १४.२ किलो वजनाचे सिलिंडर मिळणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात १ तर ५ किलो वजन सिलिंडरच्या लाभार्थ्यांना १ महिन्यात जास्तीत जास्त ३ तर ३ महिन्यात एकूण ८ सिलिंडर दिले जाणार आहेत. १४.२ किलो सिलिंडरच्या लाभार्थ्यांना अंतिम सिलिंडर मिळण्याच्या १५ दिवसानंतर तर ५ किलो सिलिंडरच्या लाभार्थ्यांना ७ दिवसानंतर पुढील सिलिंडर मिळण्यासाठी नोंदणी करता येईल. सिलिंडरची आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर लाभार्थ्यांना आॅर्डर क्र मांक पाठविण्यात येणार आहे.या ऑर्डर क्रमांकाची ऑईल कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंद होणार आहे. त्यांतर्गत कॅश मेमो काढल्यानंतर ग्राहकांना एका एसएमएस संदेशाद्वारे कोड क्रमांकाची तथा द्यावयाच्या रक्कमेची माहिती देण्यात येईल. हा क्रमांक एजंसीचा जो व्यक्ती सिलिंडर घेऊन आलेला असेल त्याला सांगून गॅस सिलिंडर स्वीकारायचा आहे. जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी उज्ज्वला योजनेचा लाभ घ्यावा.विशेष म्हणजे, ही सेवा घरपोच दिली जाणार असल्याने कुणीही घराबाहेर पडू नये असे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी कळविले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक