लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आजच्या सोशल मीडियाच्या युगात 'हाय, हॅलो' इतका साधा मेसेजही धोक्याची घंटा असू शकतो. सध्या 'आयएएस', 'आयपीएस' अधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाती बनवून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे.
हे सायबर गुन्हेगार लोकांचा विश्वास जिंकून त्यांना जाळ्यात ओढतात. त्यामुळे कोणताही अनोळखी मेसेज आल्यास किंवा संशयास्पद प्रोफाइल दिसल्यास, रिप्लाय करण्यापूर्वी किंवा फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी खूप विचार करा. आपली सावधगिरीच आपल्याला संभाव्य आर्थिक आणि मानसिक नुकसानीपासून वाचवेल. जागरूक राहा आणि सुरक्षित राहा याला बळी पडू नका, असे आवाहन पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी केले आहे.
शिक्षेची काय तरतूद ?
- मानहानी: बीएनएस कलम ३५६ अंतर्गत २ वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड.
- सायबर स्टॉकिंग : बीएनएस कलम ७३ अंतर्गत ३ ते ५ वर्षापर्यंत कारावास.
- अश्लील सामग्री: माहिती तंत्रज्ञान कायदा-२०००चे कलम ६७ अजूनही लागू आहे, ३ वर्षांपर्यंत कारावास व दंड.
- फेक न्यूज-अफवा : बीएनएस कलम १७१ अंतर्गत ३ वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड.
५ जणांना नोटीसपद प्रोफाइल पास रिप्लाय स्वीकारण्यापूर्वी बजावली आहे. पुन्हा असा पूर्वी किंवा फ्रेंड विचार करा. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करण्यासह बदनामी आणि विनाकारण त्रास देणाऱ्या ५ जणांना सायबर पोलिसांनी नोटीस प्रकार केल्यास कठोर आला आहे. कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
कोणत्या तक्रारी ?
- एआय इमेज : सायबर बुलिंग ऑनलाइन माध्यमातून एखाद्याला त्रास देणे, धमक्या देणे, अपमानास्पद मेसेज पाठवणे किंवा ट्रोल करणे.
- सायबर स्टॉकिंग: ऑनलाइन पाठलाग करून त्यांना त्रास देणे.
- फेक अकाउंट्स : बनावट प्रोफाइल तयार करून फसवणूक करणे किंवा ओळख चोरून त्याचा गैरवापर करणे.
- मॉफिंग : फोटो किंवा व्हिडीओ मॉर्फ करून त्यांचा गैरवापर करणे, अश्लील फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणे.
- हॅकिंग : एखाद्याचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करून त्याचा गैरवापर करणे. फिशिंग खोट्या लिंक्स किंवा मेसेजद्वारे वैयक्तिक माहिती किंवा बैंक डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न करणे.
काळजी काय घ्याल?
- प्रायव्हसी सेटिंग्ज तपासा : प्रायव्हसी सेटिंग्स तपासा आणि ती कडक ठेवा.
- वैयक्तिक माहिती मर्यादित ठेवा : तुमचा पूर्ण पत्ता, फोन नंबर, जन्मतारीख किंवा इतर संवेदनशील माहिती शेअर करणे टाळा.
- लोकेशन शेअरिंग बंद करा : अनावश्यक ठिकाणी लोकेशन शेअरिंग बंद ठेवा.
- मजबूत पासवर्ड वापरा : मजबूत आणि युनिक पासवर्ड वापरा. यामध्ये अक्षरे, अंक, चिन्हांचा समावेश असावा.
- टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा : जिथे शक्य असेल तिथे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा टू-स्टेप व्हेरिफिकेशन सक्रिय करा.
- फिशिंगपासून सावध राहा: संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका.
"सोशल मीडियावर बनावट खाते वापरून मुली-महिलांना त्रास देणे, बदनामी करणे अशा तक्रारीही वाढल्या आहेत. अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते. फसवणूक किंवा काही अडचण वाटल्यास १९३० वर संपर्क करा."- पुरुषोत्तम अहेरकर, पोलिस निरीक्षक, सायबर सेल, गोंदिया.