लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: देवरी तालुक्यातील सिरपूर बांध येथे सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास एका चारचाकीची धडक लागून दुचाकीस्वाराचे अपघाती निधन झाले. सिरपूरचा रहिवासी असलेला विवेक आनंदराव मेंढे (२२) हा युवक आपल्या दुचाकीने जात असताना त्याला समोरून येणाऱ्या चारचाकीने धडक दिली. या अपघातात विवेक गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.राष्ट्रीय महामार्ग ६ च्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने हा मार्ग एकेरी झाला आहे. त्यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. विवेक मेंढे याच्या आजोबांचाही एक दिवसाआधी या रस्त्यावर अपघात झाला होता व ते देवरी येथील रुग्णालयात होते. त्यांना दुपारचा डबा नेऊन देत असताना विवेकला अपघात झाला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
गोंदिया जिल्ह्यात चारचाकी व दुचाकीची धडक; तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 13:55 IST
देवरी तालुक्यातील सिरपूर बांध येथे सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास एका चारचाकीची धडक लागून दुचाकीस्वाराचे अपघाती निधन झाले.
गोंदिया जिल्ह्यात चारचाकी व दुचाकीची धडक; तरुण ठार
ठळक मुद्देदवाखान्यात असलेल्या आजोबांसाठी नेत होता डबा