गोंदिया : येथील रिलायन्स हॉस्पिटलमधील ‘रिलायन्स कॅन्सर केअर सेंटर’ने प्रत्येक रुग्णाला दर्जेदार उपचार देण्याचे वचन दिले आहे. हे हॉस्पिटल या भागात सुरू झाल्यापासून येथे ‘रेडिएशन थेरपी’ची चार हजार सत्रे घेण्यात आली आहेत. येथे केमोथेरपीचे विविध उपचार केले जातात. बाह्य रुग्णांना सल्ला दिला जातो. या केंद्रामध्ये आरोग्य तपासणी, कर्करोग निदान शिबिरे यांचे अनेकदा आयोजन करण्यात आलेले आहे.
या भागातील वैद्यकीय समुदायांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष उपक्रमही घेण्यात येत असतात. कर्करोगाविषयी जनजागृती करणे व स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्ययावत उपचारांविषयी माहिती देणे, हे काम हे केंद्र करीत असते. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील उच्चप्रशिक्षित व समर्पित सल्लागारांनी येथील उपचार पद्धतीला मान्यता दिली आहे. जागतिक स्तरावरील उपचारांचा रुग्णांना फायदा होत आहे. कर्करोगांवरील अत्याधुनिक उपचार केवळ मेट्रो शहरांपुरतेच मर्यादित न ठेवता, महाराष्ट्रातील मध्यम व लहान शहरांमध्येदेखील देता यावा, यासाठी गोंदियात ‘रिलायन्स कॅन्सर केअर सेंटर’ उभारण्यात आले. हे केंद्र सुरू झाल्यापासून गोंदिया व परिसरातील रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार मिळत आहे. हे केंद्र महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारची ही प्रमुख आरोग्य विमा योजना 'ए' दर्जाची असून, या भागात हा दर्जा आणि आयुष्मान भारत मिळविणारे हे पहिले आणि एकमेव रुग्णालय आहे. कोविड-१९’च्या साथीच्या काळात या योजनेंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन रुग्णालयांचा गौरव महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी करण्यात आला. त्यात ‘रिलायन्स हॉस्पिटल’चाही समावेश होता.