तवेरा कालव्यात पडली : महामार्गावर उभ्या ट्रकला ठोकलेगोंदिया/देवरी : डुग्गपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुंडीपार ईश्वर शिवारातील चुलबंद जलाशयाच्या कालव्यात एक टवेरा रविवारच्या सायंकाळी ७.४५ वाजतादरम्यान पडल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. भरत गोपीनाथ डोंगरवार (४२) व हिरामन पतीराम डोंगरवार (५०) रा. धानोड ता.साकोली जि.भंडारा हे जागीच ठार झाले. तवेरा (एमएच २७ एसी २५५४) चा चालक विलास हरिचंद डोंगरवार (३५) रा.धानोड ता.साकोली जि. भंडारा याने त्या वाहनाला हलगर्जीपणे चालविल्यामुळे ती तवेरा चुलबंद जलाशयाच्या कालव्यात पडली. या अपघातात दोघे ठार तर तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये देवदास लक्ष्मण रामटेके (५१) व विलास हरिचंद डोंगरवार (३५) व वाहन चालक विलास डोंगरवार (३५) तिन्ही रा. धानोड ता. साकोली यांचा समावेश आहे. चौकशीवरून डुग्गीपार पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात भादंविच्या कलम २७९, ३३७, ३०४ अ सहकलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.दुसरी घटना तिरोडा तालुक्याच्या नवेगाव खुर्द येथे रविवारच्या रात्री १०.४५ वाजतादरम्यान झालेल्या अपघातात ३५ ते ४० वर्ष वयोगटातील इसमाचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने त्या इसमाला धडक दिली. चौकशीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३०४ अ सहकलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या काठाने उभ्या असलेल्या एका ट्रकला भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारच्या मध्यरात्री अडीच वाजता घडली. देवरीत जैन मंदिरासमोर राष्ट्रीय महामार्गावर एक ट्रक उभा होता. उभ्या असलेल्या ट्रकला नागपूर वरुन भीलाईकडे अंगुर भरुन जात असलेल्या ११०९ ट्रक क्र. एमएच ११ एएल २५६५ ने मागच्या बाजूने जोरदार टक्कर दिली. त्यामुळे ट्रकचा चालक आकबा गायकवाड (४०) रा. सांगोली, जि. सोलापूरचा जागीच मृत्यू झाला.
तीन अपघातात चार जण दगावले
By admin | Updated: April 23, 2015 00:36 IST