शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शहरात एकाच रात्री चार घडफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 22:20 IST

दिवाळी झाल्यावर अनेक जण देवदर्शनाला किंवा स्वगावी जातात.  या दरम्यान घर बंद असल्याचा गैरफायदा चोरटे घेत असतात. बंद दार असलेले घर पाहून आरोपी ते घर साफ करण्यासाठी टपून बसलेले असतात. तेव्हा दिवाळीला गावी जाताना शेजाऱ्यांना किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात याची माहिती दिल्यास ते हितावह ठरेल.  

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीचा सण होताच आप्तस्वकीयांच्या घरी भेट देण्यासाठी किंवा घर बंद करून भ्रमंती करायला गेलेल्या लोकांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी अडीच लाखांचा माल पळविला. गोंदिया शहरात २९ ऑक्टोबरच्या पहाटे चार ठिकाणी घरफोडी केली. तर दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला. या घटनांची नोंद गोंदिया शहर व रामनगर पोलिसांनी घेतली आहे.गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या साई नगरातील संतोष सुरसे यांच्या घरी भाड्याने राहणारे परमानंद भय्यालाल गायधने (४५) रा. जवरी, ता. आमगाव यांच्या खोलीतून ५५ हजार रुपये रोख पळविली. मुलीच्या पिगी बॅंकेमध्ये ठेवलेले ५ हजार व आलमारीत ठेवलेले ५० हजार रुपये रोख असा माल पळवून नेला. परमानंद गायधने हे आपल्या कुटुंबासह २६ ऑक्टोबर रोजी जवरी या आपल्या स्वगावी गेले होते. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता ते परतल्यावर त्यांच्या खोलीवर चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यांचे ठेवलेले दागिने दुसरीकडे असल्यामुळे ते चोरट्यांच्या हातात लागले नाहीत. परिणामी ते दागिने वाचले. दुसरी घटना गोंदियाच्या गौशाला वाॅर्डातील आसाराम बापू आश्रमाजवळ घडली. पैकनटोली येथील सुरेश खुमान डोहरे (३५) या भाजीविक्रेत्याच्या घरून ६१ हजार ८०० रुपयांचे दागिने पळविले. ते आपल्या कुटुंबासह जावयाला घेऊन हरिव्दार येथे देवदर्शनासाठी गेले असताना २८ ते २९ ऑक्टोबरच्या रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी एमएच ३५ ए.एस. ७७४५ मोटारसायकल किंमत ४० हजार, एक जोड सोन्याचे झुमके किंमत २ हजार, चांदीची साखळी, चांदीचा गुच्छा, जोडवे, ११ नग चांदीचे सिक्के व १५ हजार रुपये रोख असा एकूण ६१ हजार ८०० रुपयाचा माल पळविला. तिसरी घटना रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अरिहंत कॉलनी कुडवा येथील आहे. डॉ. तुषार प्रकाश पारधी (२५) यांच्या घरून ५५ हजार रुपये रोख, ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, आदर्श कॉलनी कुडवा येथील नत्थू सीताराम जामवंत (६३) यांच्या घरून एमएच ३५ एएफ ६९६४ ही किंमत ९ हजार रुपयाची मोटरसायकल पळविली. या चारही घटनांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.

बंद घरांवर चोरट्यांची नजर - दिवाळी झाल्यावर अनेक जण देवदर्शनाला किंवा स्वगावी जातात.  या दरम्यान घर बंद असल्याचा गैरफायदा चोरटे घेत असतात. बंद दार असलेले घर पाहून आरोपी ते घर साफ करण्यासाठी टपून बसलेले असतात. तेव्हा दिवाळीला गावी जाताना शेजाऱ्यांना किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात याची माहिती दिल्यास ते हितावह ठरेल.  

दोन घरी चोरीचा प्रयत्न- रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अरिहंत कॉलनी कुडवा येथील राजेंद्र आर लिल्हारे व युवराज बालू गायधने या दोघांच्या घरी अज्ञात आरोपींनी चोरीचा प्रयत्न केला. परंतु लोकांचा आवाज ऐकून आरोपी पसार झाले.ही घ्या काळजी- दिवाळीच्या काळात कष्टाने कमावलेले दागिने, पैसे चोरट्यांच्या हाती पडू नयेत यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना घराकडे लक्ष ठेवायला सांगावे, दाराला कुलूप लावून तसेच खिडक्या व गॅलरीचे दरवाजे बंद करून ठेवावेत, असा सल्लासुध्दा दिला होता.

 

टॅग्स :Thiefचोर