काँग्रेसचा दावा : ५ आॅगस्टला स्पष्ट होणार चित्रगोंदिया : नगर अध्यक्षपदासाठी चार उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनी शुक्रवारी (दि.१) या चारही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे नगर पालिकेतील चारही पक्षातील प्रत्येकी एका सदस्याने आपला अर्ज भरला आहे. यामुळे आता मैदानात कोण राहणार हे येत्या ५ आॅगस्ट रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिनी स्पष्ट होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, १ आॅगस्ट रोजी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करावयाचे होते. त्यानुसार, भारतीय जनता पक्षाकडून कशिश जायस्वाल, शिवसेनाकडून राजकुमार कुथे, राष्ट्रवादीतून पंकज यादव तर कॉंग्र्रेसकडून राकेश ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात भाजप व शिवसेना युती असल्याने संख्याबल बघता शिवसेना आपला अर्ज मागे घेणार असल्याचे दिसते. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीची युती असून कॉंग्रेस कडून नगराध्यक्षपदाची मागणी केली जात असल्याची माहिती आहे. अशात या दोघांतून कोण आपला अर्ज मागे घेतो हे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ५ आॅगस्ट रोजी स्पष्ट होणार. तर नगराध्यक्षपदासह उपाध्यक्षपदासाठीही ६ आॅगस्ट रोजीच निवडणूक होणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवारांचे अर्ज
By admin | Updated: August 3, 2014 00:11 IST