शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर अडविल्याने वनरक्षकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, शासकीय कामकाजात अडथळा: तीन आरोपीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 23:50 IST

Crime News: रेतीचा ट्रॅक्टर अडविल्याचा राग मनात धरून वनरक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली.ही घटना बंध्या ते खोळदा पांदण रस्त्यावर बुधवारी सकाळी घडली.

- लोकमत न्युज नेटवर्कअर्जुनी मोरगाव -रेतीचा ट्रॅक्टर अडविल्याचा राग मनात धरून वनरक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली.ही घटना बंध्या ते खोळदा पांदण रस्त्यावर बुधवारी सकाळी घडली.या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

वनरक्षक सचिन पुरुषोत्तम गावंडे व त्यांचे सहकारी कर्मचारी सचिन अभिमन मेश्राम,दीपक बुद्धू सापा व लहानू सखाराम नैताम हे बुधवारी सकाळी गस्तीवर होते.ते १०७२(ए) खोळदा बिटमधील बंध्या ते खोळदा पांदण रस्त्यावर होते.गोपीनाथ देशमुख व लक्ष्मण देशमुख यांनी रेतीचा ट्रॅक्टर अडविल्याचा राग मनात धरून वनरक्षकांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली.व वनरक्षकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली.सुमारे एक ब्रास रेतीची चोरी केली.आरोपींनी शासकीय कर्तव्यात अडथळा आणला.

महागावचे वनरक्षक सचिन गावंडे (३३) यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी गोपीनाथ दौलत देशमुख (५५),लक्ष्मण गोपीनाथ देशमुख (३०) व रणवीर नगरधने (४०) तिन्ही रा महागाव याचेविरुद्ध कलम ३५३,३३२,१८६,३७९,३४ भादवी चा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक विलास नाळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक संभाजी तागड,पोलीस हवालदार महेंद्र पुण्यप्रेडीवार तपास करीत आहेत.

रेतीचोरीत संगनमत महागावनजीक बोरी व नकटी घाट आहे.गाढवी नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे.या जागेतून रेतीचा उपसा केला जातो.येथे ६ ते ७ रेतीतस्कर आहेत.या रस्त्याने दुसऱ्या तस्कराने ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक करू नये यासाठी कुंपण करून रस्ते अडविण्याचेही प्रकार केले जातात.तस्करांनी नदीकाठावर तर मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे.एवढा प्रकार होत असतांनाही मंडळ निरीक्षक, तलाठी गप्प कसे ? यावरून हा सर्व प्रकार संगनमताने केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी