शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांपासून सेवानिवृत्त परिचर पेन्शनसाठी मारतो चकरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:12 IST

Gondia : आर्थिक अडचणीत सापडलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची कुणी घेणार का दखल?

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग (गोंदिया) येथे कार्यरत परिचर सेवकपुरी ईश्वरपुरी मुलतानी हे ३० एप्रिल २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. परंतु अडीच वर्षे लोटूनही त्यांना पेन्शन देण्यात आली नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.

सेवानिवृत्त परिचर मुलतानी हे येथील बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागातून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी पेन्शन प्रकरण तयार करून संबंधित लिपिकाकडे सादर केले होते. यासंदर्भात त्यांनी लिपिक, वरिष्ठ लिपिक व कार्यकारी अभियंता रा. गो. कुरेकार यांच्याकडे विनवणी केली. परंतु त्यांनी मुलतानी यांच्या पेन्शन प्रकरणाकडे लक्ष दिले नाही. एक-दोन नव्हे तर तब्बल ३० महिने लोटूनही त्यांना पेन्शन सुरू झाली नाही. पेन्शन कोणत्या कारणाने थांबलेली आहे. 

यासंदर्भात मुलतानी विचारत असता त्यांना ते उत्तरही देत नाही. नागपूर येथील वेतन पडताळणी पथकाने घेतलेल्या आक्षेपाची पूर्तता केल्याचे संबंधित विभागाने सेवानिवृत्त परिचराला सांगितले. तरीही त्यांना पेन्शन सुरू झाली नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी मुलतानी यांनी केली आहे.

सावकाराकडून कर्ज घेऊन करावा लागतो औषधोपचार मुलतानी यांना आपल्या कुटुंबाचे पालन पोषण व औषधोपचारासाठी सावकारांकडून कर्ज घेऊन आपले काम भागवावे लागत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या मुलतानी यांच्यावर कार्यकारी अभियंता कुरेकार व उपविभागीय अभियंता चंद्रकांत डोंगरे यांनी आत्महत्येची पाळी आणल्याचे ते म्हणाले.

त्या दोघांचे वेतन थांबवा कार्यकारी अभियंता कुरेकार व उपविभागीय अभियंता डोंगरे या दोघांच्या हलगर्जीपणामुळे माझे ३० महिन्यांपासून पेन्शन प्रकरण अडकले आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी करून मला पेन्शन मिळत नाही तोवर, या दोघा अधिकाऱ्यांचे वेतन थांबविण्यात यावे अशी मागणी मुलतानी यांनी केली आहे.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनgondiya-acगोंदिया