शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशी गोंदियाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 17:40 IST

पारा वाढत असल्याने दुपारच्या वेळेस शहरातील रस्त्यांवरील गर्दीसुद्धा कमी झाल्याचे चित्र आहे.

गोंदिया : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (दि.२०) सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्यात ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील पंधरा दिवसांतील हे सर्वाधिक तापमान होय. वाढत्या तापमानामुळे दैनंदिन वेळापत्रक बदलले असून, शेतकरीसुद्धा सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व कामे आटोपून घेत असल्याचे चित्र आहे.

हवामान विभागाने यंदा उन्हाळा चांगलाच तापणार, असा इशारा दिला होता. मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. मार्च महिन्यातच पारा ४० अंशांवर गेल्याने एप्रिल व मे महिन्यात सूर्य चांगलीच आग ओकणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तो काहीसा खरा ठरत आहे. बुधवारी गोंदियाचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पारा वाढत असल्याने दुपारच्या वेळेस शहरातील रस्त्यांवरील गर्दीसुद्धा कमी झाल्याचे चित्र आहे.

यंदाचा उन्हाळा चांगलाच तापणार, असे सुरुवातीपासूनच बोलले जात होते. ते अगदी खरे होताना दिसत आहे. एप्रिल महिना लागताच सूर्य आणखी आग ओकू लागल्याने पारा दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र, क्षणिक दिलासा दिल्यानंतर उन्हाने परत एकदा आपली तीव्रता दाखवून दिली आहे. वाढत्या तापमानामुळे कूलर, पंखेसुद्धा काम करीत नसून त्यातच खंडित वीज पुरवठ्याने भर घातली आहे. उन्हाची तीव्रता बघता, घराबाहेर डोकावून बघताच अंगाचा थरकाप होतो. मात्र, कामामुळे घराबाहेर पडावेच लागते. दुपारच्या उन्हात निघू नका, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात