शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोन अनाथ भावंडाना अन्नधान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:12 IST

दोन अथान भावडांचा मुद्दा लोकमतने लावून धरला. त्याचीच दखल घेत सामाजिका कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर यांच्या सहकार्याने निमगाव येथील अनाथ झालेल्या दोन भावंडाना अन्नधान्य, किराणा सामान आणि शालेय साहित्याचा पुरवठा घरपोच करण्यात आला.

ठळक मुद्देसविता बेदरकर यांचा पुढाकार : किराणा व शालेय साहित्याची मदत

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : दोन अथान भावडांचा मुद्दा लोकमतने लावून धरला. त्याचीच दखल घेत सामाजिका कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर यांच्या सहकार्याने निमगाव येथील अनाथ झालेल्या दोन भावंडाना अन्नधान्य, किराणा सामान आणि शालेय साहित्याचा पुरवठा घरपोच करण्यात आला.निमगाव येथील रोशन गिरधारी कांबळे (१३) व आशीष कांबळे (११) हे दोघेही भाऊ जन्मदात्यांचे छत्र हिरावल्याने मागील दोन वर्षांपासून अनाथ होवून हलाखीचे जीवन जगत आहेत. त्या अनाथ भावंडाचे पालनपोषण सद्यस्थिती वयोवृद्ध आजी-आजोबा करीत आहेत. सामान्य कुटुंबातील असलेले दोघेही भाऊ शासनाच्या मदतीपासून वंचित होते.निमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लहू नाकाडे यांनी ‘लोकमत’चे प्रतिनिधी अमरचंद ठवरे यांच्याकडे त्या अनाथ भावंडाची व्यथा मांडली. लोकमतच्या माध्यमातून त्या दोघा भावंडांना मदत मिळवून देण्याची विनंती केली होती. गरिबीमध्ये जीवन व्यथित करणारे रोशन व आशीष या अनाथ भावांना मदत करण्याचे आवाहन केले. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी त्या दोन भावांना मदतीचे आश्वासन दिले. तसेच लगेच या दोन भावडांना तांदूळ, गहू, तेल, किराणा सामान व शालेय साहित्य या दोन भावडांना त्यांच्या घरी जाऊन दिले.गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत दोघेही भाऊ शिक्षण घेत आहेत. त्या ठिकाणी उपसरपंच तसेच सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विलास गायकवाड यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते लहू नाकाडे, मुख्याध्यापक बाळकृष्ण ब्राम्हणकर यांच्या उपस्थितीत दोघाही भावांना अन्नधान्यासह इतर साहित्य सुपूर्द करण्यात आले.याप्रसंगी शिक्षक सदानंद मेंढे, मनोहर हातझाडे, प्रल्हाद कापगते, माहेश्वर सूर्यवंशी, सुरेखा गिºहेपुंजे, विश्रांती भोयर, अमिता शेळके प्रामुख्याने उपस्थित होते. लोकमतच्या पाठपुराव्यामुळेच मदत मिळाल्याचे सांगत त्या दोन्ही भावंड व गावकºयांनी आभार मानले. सामान्य कुटुंबातील अनाथ झालेल्या दोघा भावांच्या चेहºयावर हास्य फुलविण्यासाठी दानदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.शासनाने घ्यावी जबाबदारीराज्याचे सामाजीक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे याच जिल्ह्याचे रहिवासी आहे. त्यांनी या दोन भावडांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेऊन शासनाकडून मदत मिळवून द्यावी. तसेच समाजातील दानदात्यांनी या अनाथ भावडांच्या पाठीशी उभे राहावे. अशी मागणी निमगाव येथील गावकºयांनी केली आहे.