शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

नियम पाळा; अपघात टाळा

By admin | Updated: January 12, 2017 00:18 IST

सिमेवर जसे सैनिक परकीय शत्रुपासून आपले संरक्षण करतात.त्याचप्रमाणे वाहतुक पोलीस हे सुध्दा सर्व जनतेला वाहतुकीचे नियम पटवून देवून

रस्ता सुरक्षा सप्ताह : २०० विद्यार्थ्यांचा सहभाग गोंदिया : सिमेवर जसे सैनिक परकीय शत्रुपासून आपले संरक्षण करतात.त्याचप्रमाणे वाहतुक पोलीस हे सुध्दा सर्व जनतेला वाहतुकीचे नियम पटवून देवून अपघातावर आळा घालण्याचे काम करीत असतात. वाहन चालकांनो नियम पाळा व अपघात टाळा असे, आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एस.राठोड यांनी केले. महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव कॅम्प डुग्गीपारतर्फे वतीने २८ व्या महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०१७ चे उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ९ जानेवारी सोमवारला सकाळी ११.५५ वाजता करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी सडक-अर्जुनी येथील इंदिरा गांधी औद्योगिक प्रशिक्षण विद्यालय तसेच राजश्री शाहू महाराज कृषी विद्यालय सडक-अर्जुनी येथील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक,शिक्षीका २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रबोधनपर घोष वाक्याची घोषणा करीत विद्यालयातून १०.३० वाजता मिरवणूक काढून ११.४५ वाजता कार्यक्रमस्थळी पोहचली. त्यात १५० ते २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन सोहळ्याचा समारंभ ११.५५ वाजता सुरू झाले. उद्घाटन तहसीलदार व्ही.एम.परळीकर, अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एस.राठोड, प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार केशव वाबळे, पुरूषोत्तम लोहीया, हर्ष मोदी, भाऊराव गजभिये, अजय अग्रवाल, महेश डुंबरे, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, अनिल मुनिश्वर, राऊत, निमगडे, कठाणे, चौधरी, पिट्टलवार उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते लालफित कापून सरस्वती मातेच्या फोटोचे पूजन करून दीप प्रज्वलीत करण्यात आले. महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव कॅम्प डुग्गीपारचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचीन पवार, सहायक फौजदार राजेंद्र टिकारीया, पोलीस हवालदार श्रीधर शहारे, परसराम गायकवाड, शिवा ईश्वार, सुदेश नागदिवे, योगेश्वर कावळे, ज्ञानेश्वर तुमडाम, निरंजन भगत, दिपक रहांगडाले, चंद्रकांत बरकुंट, विनोद ठाकूर यांचे स्वागत करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांची शपथ ग्रहण केली. प्रास्ताविक भाषण सपोनि सचीन पवार यांनी केले. संचालन पोलीस हवालदार श्रीधर शहारे यांनी तर आभार सहायक फौजदार राजेंद्र टिकारीया यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटक पाहुणे परळीकर यांनी आपले भाषणात वाहतुकीचे नियम पाळून अपघातावर आळा घालण्यासंबधाने मार्गदर्शन केले. आपल्या लहानशा चुकीमुळे दुसऱ्याच्या संसार उध्दवस्त होतो याची जाणीव करून दिली. प्रमुख पाहुणे सपोनि वाबळे यांनी वाहतुकीचे नियम पालन केले तर तुमचे जीवन सुखमय होईल. अपघात घडण्याचे प्रमाण कमी होण्यास तुमचा हातभार लागेल जीवितहाणी व वित्तहाणी टाळता येईल असे मार्गदर्शन केले. पोलिसांना अपघातास आळा बसविण्याकरीता जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाला १५० ते २०० विद्यार्थी प्रतिष्ठीत नागरिक, शिक्षक, उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)