परदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 06:00 AM2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T06:00:07+5:30

पत्रकार परिषदेला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे,प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगिता पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी चीन, कोरिया, मलेशिया,सिंगापूर, इटली, इराण या देशातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

Focus on travelers coming from overseas to the district | परदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष

परदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष

Next
ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : अफवांवर विश्वास ठेऊ नका, कोरोना जनजागृती,वैद्यकीय महाविद्यालयात कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा संशयीत रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरण्याची गरज नसून आपल्या आरोग्याविषयी सजग असणे आवश्यक आहे.कोरोनाची लागण ही प्रामुख्याने बाहेर देशातून येणाºया नागरिकांपासून होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.तसेच यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.१२) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे,प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगिता पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी चीन, कोरिया, मलेशिया,सिंगापूर, इटली, इराण या देशातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. तसेच परदेशातून आलेल्या रुग्णांनी याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी. त्यांनी आरोग्य विषयक तपासणी करुन खबरदारीचा उपाय म्हणून पंधरा दिवस घराबाहेर पडू नये, अशा सूचना सुध्दा त्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. याची माहिती प्रशासनाला मिळावी यासाठी एक पथक सुध्दा तयार करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगिता पाटील आणि जिल्हा साथरोग अधिकारी निरंजन अग्रवाल यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या जात आहे. मात्र नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, कुणाला शंका आल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन याची खात्री करुन घ्यावी. कोरोनाचे संशयीत रुग्ण आढळल्यास त्यांना दाखल करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात १० खाटांचे विशेष विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तसेच तालुका स्तरावर सुध्दा अशा कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय गरज पडल्यास गोंदिया नगर परिषदेच्या दोन शाळांमध्ये कक्ष सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली असल्याचे सांगितले.

पोस्टर बॅनर व जिंगलमधून जनजागृती
कोरोना संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पोस्टर, बॅनर तसेच नगर परिषदेच्या कचरा संकलन करणाºया वाहनांवरील लाऊड स्पिकरवर जिंगलच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बलकवडे यांनी सांगितले.
गर्दी होणारे कार्यक्रम घेणे टाळा
जिल्ह्यात मेळावे, सामुहिक विवाह सोहळे, यात्रा तसेच गर्दी होणारे कार्यक्रम १५ एप्रिलपर्यंत घेण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व शासकीय विभागाना करण्यात आल्या आहे. तसेच नागरिकांनी सुध्दा असे कार्यक्रम घेऊन नये अथवा काही दिवस अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे टाळावे. जिल्हा प्रशासनाने सुध्दा असे कार्यक्रम काही दिवस पुढे ढकलले असल्याचे जिल्हाधिकारी बलकवडे यांनी सांगितले.
शाळांमध्ये हॅन्डवॉश डे
कोरोना व्हायरसचा संर्सग होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी आणि उपाय योजना केल्या जात आहे. शाळांमध्ये यासंदर्भात जनजागृती केली जात असून शाळांमध्ये नियमित हॅन्डवॉश डे घेण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापणाला करण्यात आल्या आहे.

Web Title: Focus on travelers coming from overseas to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.