लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्याच्या रिसामा येथील सासू निर्मला प्रेमलाल बोहरे व सून सविता नरेंद्र बोहरे यांनी आपल्या शेतात बागायती शेती करून त्यातून संसार सावरण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांनी सेंद्रिय शेती करण्याला प्राधान्य दिल्यामुळे त्याच्या शेतातून निघणाऱ्या हिरव्या भाजीपाल्याला रिसामा, आमगाव, बनगाव, किडंगीपार, पदमपूर, बाम्हणी, कुंभारटोली व बिरसी येथील लोकांची मागणी आहे. सासू सुनेने मेहनतीने फुविलेल्या शेतीने इतरांसमोर देखील आदर्श निर्माण केला आहे.शेतीतून आपला संसार सावरण्यासाठी व शेतीतून उत्तम उत्पादन कसे घेता येत हे पटवून देण्यासाठी त्यांनी बागायती शेती करण्याचा मार्ग पत्करला. पारंपारीक धानाची शेती परवडत नसल्याने त्यांनी बागायती शेती करण्याचा संकल्प केला. परंतु बागायती शेती करणे आपल्याला जमेल किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी त्यांनी प्रायोगिक तत्वावर एक एकर शेतात बागायती शेती करायला सुरूवात केली. एका एकरात त्यांनी कारले, भेंडी, पालक, कांदे, वांगी, टोमॅटो, काकडी, दुधी भोपळा असे आंतरपीक घेण्यास सुरूवात केली. शेतकºयाने शेतातून काढलेले पीक दलाल अथवा व्यापाऱ्यांच्या हातात दिले तर तुटपुंज्या पैश्यावर शेतकºयांना समाधान मानावे लागते. त्यामुळे त्यांनी मध्यस्थामार्फत भाजीपाल्याची विक्री न करताना थेट ग्राहकांना भाजीपाला विकण्यास सुरूवात केली. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा झाला. ग्राहकांना ताजा आणि सेंद्रिय भाजीपाला माफक दरात मिळू लागल्याने त्यांच्याकडील भाजीपाल्याची मागणी वाढली. व्यापाºयांना किंवा दलालांना भाजीपाला न देता सासू निर्मला बोहरे मुलांच्या मदतीने शेती सांभाळतात. तर सून सविता बोहरे या उत्पादित भाजीपाला आमगाव, रिसामा या परिसरात स्वत:च विक्री करतात. त्यामुळे थेट नफा मिळण्यास आणि ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला मिळण्यास मदत होत आहे.शेतीला विकसीत करण्यासाठी मार्गदर्शनएक एकरात लावलेल्या बागायती शेतीसाठी योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांनी कृषी देवराम चुटे यांचे मार्गदर्शन घेतले. साखरीटोला येथील कृषी मित्र देवराम चुटे यांनी त्यांच्या शेतावर जाऊन सासू सुनेला शेती संदर्भात योग्य मार्गदर्शन केले. पुढे बागायती शेती वाढविण्याचा त्यांचा विचार आहे. आमगाव भाजीपाल्यासाठी मोठी बाजारपेठ असल्याने त्यांनी या बाजारपेठेत आपल्या शेतीतील माल विकण्याचा निर्णय घेतला आहे.
पाण्याच्या बचतीसाठी ठिबक सिंचनबागायती शेतीला पाणी मोठ्या प्रमाणात लागू नये म्हणून त्यांनी संपूर्ण एक एकरात बागायती शेती केली आहे. त्या बागायती शेतीसाठी ठिबक सिंचनाची सोय करण्यात आली आहे. शेतात विहीर आहे परंतु विहिरीचे पाणी पंपाद्वारे दिल्याने पाण्याचा अपव्यय होईल म्हणून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी पाण्याचीही बचत केली आहे.पावसाचे पाणी जमिनीत मुरविणारया शेतात पावसाचे पाणी पडेल ते पाणी जमिनीत मुरविण्यासाठी त्यांनी शेतात विहिरीची सोय करून ठेवली आहे. बांद्यामध्ये जमा होणारे पाणी विहिरीत टाकून ते पाणी जमिनीत मुरविण्याची त्यांची तयारी आहे. परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठीही त्यांचे प्रयत्नही सुरूच आहेत.