गोठणगाव : एओपी कॅम्प गोठणगाव येथील ध्वजारोहण प्रभारी पीएसआय असरउद्दीन शेख यांनी केले. यावेळी पोलीस पाटील कारुसेना सांगोळे, पतीराम राणे, नामदेव निखारे, एओपीचे कर्मचारी उपस्थित होते.
पीएचसी गोठणगाव
गोठणगाव : जि.प.प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सरपंच जिजा चांदेवार यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष बोदेले यांनी ध्वजारोहण केले. यावेळी पोलीस पाटील कारुसेना सांगोळे, तंमुस अध्यक्ष लालदास डोंगरवार, पतीराम राणे, पीएसआय असरउद्दीन शेख, मुख्याध्यापक कापगते, परिचारिका अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक बी. एस. फटिंग व गावकरी उपस्थित होते.
जि.प.प्राथमिक शाळा
गोठणगाव : जि.प.प्राथमिक शाळा येथे सरपंच जिजा चांदेवार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीचे अध्यक्ष संजय इस्वार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी तंमुस अध्यक्ष लालदास डोंगरवार, अंगणवाडी सेविका मदतनीस पालकवर्ग आदी उपस्थित होते.
इटियाडोह जलाशय मत्स्य सहकारी संस्था
गोठणगाव : इटियाडोह जलाशय मत्स्य सहकारी संस्था गोठणगाव येथील ध्वजारोहण अध्यक्ष राजहंस ढोके यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष रजनी सरकार, सचिव रामकृष्ण भोयर, संचालक खोकन सरदार, दिनेश रॉय, बनवारी सोनकलंगी, क्रिष्णा मंडल, निरेन रॉय, रमेश जुगनाके, गजानन कांबळे, विश्वनाथ मोहुर्ले, लेकीराम मेश्राम, ललिता हलधर व हावसा चिमणकर, संस्थेचे कर्मचारी व सभासद उपस्थित होते.
आदिवासी सेवा सहकारी संस्था, गोठणगाव
गोठणगाव : आदिवासी विविध सेवा सहकारी संस्था येथील ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष सिंगू कोवे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष भोजराम लोगडे, सचिव संतोष चांदेवार, संचालक गोपीनाथ दरवडे, डिगांबर कऱ्हाळे, श्रीराम उईके, शालिक कुंभरे, सत्यकला वाढवे, कुसुम प्रत्येकी, केंद्र प्रमुख रोषण राऊत, मारोती नरवास, मिथुन मेश्राम, महेश, रतीराम राणे, संस्थेचे सभासद उपस्थित होते.
वनक्षेत्राधिकारी कार्यालय
गोठणगाव : वनक्षेत्राधिकारी कार्यालय गोठणगाव येथील ध्वजारोहण प्रभारी वनक्षेत्राधिकारी पाटील यांनी केले. यावेळी सहायक वनक्षेत्रपाल, वनरक्षक, वन मजूर उपस्थित होते.
दीनदयाल उपाध्याय आदि. आश्रमशाळा
गोठणगाव : दीनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रमशाळा येथील ध्वजारोहण मुख्याध्यापक बी.बी. तिडके यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक मुख्याध्यापक बी.एस. गावळकर यांनी केले. यावेळी अधीक्षक एस.आर. डोंगरवार, अधीक्षक एस.जी. भांडारकर, सहायक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ापालक उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालय
गोठणगाव : ग्रामपंचायत कार्यालय गोठणगाव येथील ध्वजारोहण सरपंच जिजा चांदेवार यांनी केले. यावेळी एओपी प्रभारी पीएसआय असरउद्दीन शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष बोदेले, पोलीस पाटील कारुसेना सांगोळे, तंमुस अध्यक्ष लालदास डोंगरवार, रतीराम राणे, मुख्याध्यापक कापगते, ग्रा.पं. सदस्य नरेंद्र कोडापे, देवा नारनवरे, उमराव कऱ्हाळे, जितेंद्र निकोडे, वैशाली सोनटक्के, हिरा किरसान, पुष्पा हटवार, मोहिता जुगनाके, ग्रामसेवक एस.बी. फटिंग उपस्थित होते.