शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये धान घेऊन जाणारे पाच ट्रक ताब्यात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 16:34 IST

कार्यवाही : ऑगस्ट महिन्यात तीन व्यापाऱ्यांना ईडीने घेतले होते ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : देवरी पोलिसांनी जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात धान घेऊन जाणारे पाच संशयित ट्रक देवरी तालुक्यातील शिरपूरबांध येथील सीमा तपासणी नाक्यावर ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवारी (दि.१४) करण्यात आली. मागील महिन्यात छत्तीसगड राज्यातील ईडीच्या पथकाने गोंदियातील धान्य खरेदी-विक्री करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांना छत्तीसगड राज्यात झालेल्या धान घोटाळ्याच्या चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. त्या प्रकरणाशी हे तार जुळत असल्याची चर्चा आहे.

शनिवारी (दि.१४) देवरी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील हे गस्तीवर असताना त्यांना देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वरील शिरपूरबांध येथील आरटीओ चेक पोस्टजवळ धान घेऊन जाणारे ५ ट्रक हे एकामागे एक जात असताना त्यांच्यावर संशय आल्याने ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यात धान आढळून आले. 

तीन तालुक्यांतून जात होते पाच ट्रक यासंदर्भात पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता ट्रकमधून नेण्यात येत असलेल्या धानाच्या पोत्यावर महाराष्ट्र शासनाचा मार्क असल्याने हे धान शासकीय धान तर नाही ना याची चौकशी सुरू आहे. दोन ट्रक हे नवेगावबांध येथून आले आहेत, तर एक ट्रक सौंदड येथून आला आहे, तसेच दोन ट्रक हे आमगाव येथून छत्तीसगड राज्यात नेत असल्याची माहिती वाहन चालकांनी पोलिसांना दिली आहे.

ते धान शासकीय असेल तर करता येईल कारवाई "वाहतूक करण्यात येणारे धान शासकीय आढळल्यास ट्रक चालक आणि राइस मिल मालकांवर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात पुरवठा विभागाला पत्र देण्यात आले आहे. पुरवठा विभागाचे पत्र आल्यावरच ते धान शासकीय की खासगी, याचा उलगडा होऊ शकेल." - विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, देवरी

तर ट्रक चालक व राइस मिल मालकांवर होणार गुन्हा दाखल जिल्ह्यात सध्याच्या घडीला रब्बी हंगामात आदिवासी विकास महामंडळ, तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेला धान भरडाईकरिता राइस मिल मालकांना देण्यात येतो. छत्तीसगड राज्यात धानाला जास्त भाव मिळत असल्याने राइस मिल मालक शासकीय धानाची विक्री करतात. बाहेर राज्यातील तांदूळ विकत घेत सीएम- आरच्या नावावर शासकीय गोदामात जमा करतात. यासंदर्भात देवरी पोलिस या ट्रकमध्ये असलेल्या धानाची चौकशी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्याकडून करून घेणार आहेत. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया