काचेवानी : नैसर्गिक बदल किंवा घडामोडी या मानवी हस्तक्षेपाखाली नसतात. नैसर्गिक बदल हे निसर्गनिर्मित असून त्यांना थांबवणे किंवा त्यावर आळा घालणे कोणत्याही यंत्रणेच्या हातात नसते नाही. गेल्या दोन वर्षापासून निसर्ग आपले वेगळेच रुप दाखवत असून ेगेली तीन वर्षे शेतकरी व नागरिकांसाठी नासाडीचे ठरले. दोन दशकांत प्रथमच सोसाट्याच्या वाऱ्यासह यावर्षी या भागात पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली.सन २०१२ हे वर्ष खंडित पावसाचे गेले. सन २०१३ यावर्षी अतिवृष्टी आणि ७८ दिवस संततधार पावसातच गेले. २०१४ हे वर्ष खंडित पाऊस व वारामिश्रित पावसाचे असल्याने नुकसानकारक ठरले आहे. २० वर्षांपासून पावसाळ्याच्या वेळी वारा शांत असायचा. हवा सुरु झाली की पाऊस उडाले अशी समजूत होती आणि हे वास्तवही होते. मात्र यावर्षी पावसाची सुरूवात रोहिणी नक्षत्राच्या दिवशी २५ जून रोजी झाली. खूप वारा सुटला. सर्वांना वाटत होते की पाऊस आता येणार नाही, मात्र पावसाच्या सऱ्या सुरु झाल्या. जसजसा वारा वेग धरू लागला तसतसे पावसाने झोडपणे सुरु केले. प्रारंभी पावसाने हव्यासह हजेरी लावली. एक महिन्यानंतर जुलैच्या पंधरवड्यात चार दिवसाच्या पावसातून सर्व जनतेने वादळी पाऊस अनुभवले. संततधार पावसासोबत जोरदार सोसाट्याचे वारे वाहत होते. वारामिश्रित पावसामुळे मानवासहित जनावरे आणि पशुपक्ष्यांचे जीवन अस्तव्यस्त होऊन गेले होते. आतापर्यंत अनुभवानुसार, सोसाट्याचे वारे सुटले तर पावसाच्या सरी येथून पाऊस येणे बंद होत होते. मात्र यावेळी नैसर्गिक बदल वेगळाच दिसून आला आणि याचा प्रत्यक्ष अनुभवही अनेकांनी घेतला. पाऊस कितीही पडले तरी त्रास झाले नसते, परंतु वादळवाऱ्यासह येणारे पाऊस सर्वांसाठी त्रासदायक व नुकसानदायक ठरले. चार दिवस संततधार आलेल्या पावसासह जोरात सोसाट्याचे वारेसुद्धा वाहत होते. सोयाट्याच्या वाऱ्यासोबत पाऊस येण्याची ही दोन दशकाच्या काळात पहिलीच वेळ असल्याची प्रतिक्रिया काही वृद्ध नागरिकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. पावसासोबत वारा वाहत होता. मात्र थोड्या प्रमाणात येऊन बंद व्हायचा. सतत चार दिवस जसजसा पाऊस जोरांनी येत असे तसतशा पावसाच्या सरी जोरात पडत होत्या. अशा सरी पहिल्यांदाच पाहिल्या जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.यापूर्वी २०१२ च्या पावसाळ्यापूर्वी प्रत्येक महिन्याला पाच-सात दिवसांच्या अंतराने पावसाच्या सरी येत होत्या. उन्हाळा कसा गेला ते कळलेच नाही. पावसाळ्याचे दिवस मात्र शेतकऱ्यांसाठी कष्टदायी गेले होते. काही क्षेत्रात पाऊस तर काही क्षेत्रात मुद्दाम पाऊस नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या नाहिशा झाल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्याच नव्हत्या. रोपांअभावी शेकडो हेक्टर जमीन पडीत राहिली होती.सन २०१३ तर शेतकरी व नागरिकांसाठी अतिशय दुर्दैवी ठरले होते. त्यावर्षी वरुण देवता एवढा प्रसन्न झाला की हे वर्ष सर्वांकरिता काळवर्ष ठरले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस आले. यानंतर ७ ते ८ दिवस मोकळीकता दिल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. काही शेतकऱ्यांनी पेरण्या आरामात करुन घेण्याचे ठरवून रोखल्या होत्या. परंतु ६ जून २०१३ पासून पावसाने जोर पकडला. अपवाद म्हणून एक किंवा दोन दिवस वगळता सतत तीन महिने जोरदार पाऊस आले. गोंदिया जिल्ह्यात अंदाजे सात वेळा अतिवृष्टी झाली तर तिरोडा तालुक्यात अतिवृष्टीची ९ वेळा नोंद करण्यात आली होती. (वार्ताहर)
प्रथमच सोसाट्याच्या वाऱ्यासह पडला पाऊस
By admin | Updated: July 29, 2014 23:54 IST