शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

१४ दिवसात प्रथमच रुग्णांची संख्या दीडशेच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 05:00 IST

जिल्ह्यात शुक्रवारी ५१३ बाधितांनी कोरोनावर मात केली तर १३९ नवीन रुग्णांची नोंद झाली. दोन बाधितांचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. शुक्रवारी आढळलेल्या १३९ रुग्णांमध्ये सर्वाधिक ४३ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ९, गोरेगाव १४, आमगाव ९, सालेकसा २६, देवरी १९, सडक अर्जुनी २, अर्जुनी मोरगाव १२ आणि बाहेरील ५ रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे५१३ बाधितांची मात : १३९ रुग्णांची नोंद : २ रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात संसर्ग येतोय आटोक्यात

गोंदिया : मागील १४ दिवसातील कोरोना बाधितांच्या आकडेवारी नजर टाकल्यास बाधित रुग्णांची संख्या पाचशेच्यावरच होती. मात्र शुक्रवारी (दि. १४) प्रथमच रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. १४ दिवसात रुग्णाचा आकडा दीडशेच्या आत आल्याचे जिल्हावासीयांनासुद्धा दिलासा मिळाला आहे. तर कोरोनाचा संसर्गसुद्धा बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात शुक्रवारी ५१३ बाधितांनी कोरोनावर मात केली तर १३९ नवीन रुग्णांची नोंद झाली. दोन बाधितांचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. शुक्रवारी आढळलेल्या १३९ रुग्णांमध्ये सर्वाधिक ४३ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ९, गोरेगाव १४, आमगाव ९, सालेकसा २६, देवरी १९, सडक अर्जुनी २, अर्जुनी मोरगाव १२ आणि बाहेरील ५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांपेक्षा मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्यासुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयातील बेडसुद्धा बरेच रिकामे आहे. शिवाय आता ऑक्सिजन आणि बेडचीसुद्धा समस्या दूर झाली आहे. काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,४२,४६८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,१८,०१६ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत १,४५,१९८ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,२४,७०७ नमुने निगेटिव्ह आले आहे. आतापर्यंत एकूण ३९,०८३ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ३४,७५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ३,७०१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ५३२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. 

दुसऱ्या डोससाठी नोंदणी ऑफलाईन की ऑनलाइन कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. यातंर्गत शनिवारी (दि. १५) दहा केंद्रावर विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ४५ वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने गुरुवारी काढलेल्या आदेशात ऑनलाइन नोंदणी करण्याची गरज नसल्याचे सांगत आधारकार्ड आणि मोबाईल घेऊन केंद्रावर यावे असे म्हटले होते. तर दुसऱ्या दिवशी ऑनलाइन नोंदणी करण्याची गरज असल्याचे सांगितले जात होते. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते सुद्धा संभ्रमात होते. १ लाख ९१ हजार नागरिकांचे लसीकरण जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९१ हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे. मात्र यात दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या भरपूर असल्याने शनिवारी आणि रविवारी लसीकरणाची विशेष मोहीम जिल्ह्यात १४० केंद्रावरुन राबविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या