गोरेगावात एल्गार : शिक्षणाचा खेळ खंडोबा, अरुणनगर येथेही विद्यार्थी पोहोचले नाहीगोरेगाव : तज्ञ शिक्षकांची कमतरता त्यातच विद्यालयात एकूण १३ शिक्षकांच्या रिक्त पदाला घेऊन शिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी गुरूवारी (दि.२६) शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकले. यावेळी शिक्षण समिती व जि.प. सदस्य बबिता टेंभुर्णेकर, पं.स. सभापती चित्रकला चौधरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदलाल सोनवाने, माजी जि.प. सदस्य जगदीश येरोला, सरपंच विश्वजीत डोंगरे, व्यवस्थापन समिती सदस्य भरतलाल चव्हाण, सेवकराम नेवारे, आर.जे. अगडे, सुरेश चन्ने, उपसरपंच सलीम पठाण, तिलकचंद मडावी, घनश्याम वाघमारे, देवानंद सोनवाने, रेखा लांजेवार आदी उपस्थित होते.येथील शहीद जाम्मा-तिम्या जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात मागील एक वर्षापासून प्राचार्य एक पद, पर्यवेक्षक एक पद, विज्ञान शाखा शिक्षक तीन पद, कला शिक्षक दोन पद, हायस्कुल विभाग शिक्षक दोन पद, पदविधर शिक्षक दोन पद, इतर शिक्षक दोन पद अशी एकूण १३ पदे रिक्त आहेत. शिक्षण समिती व शाळा व्यवस्यथापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्त पदे भरण्यासाठी वारंवार शिक्षण विभागाला मागणी केली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी २७ मे रोजी बैठक घेऊन शाळेला कुलूप ठोकण्याचा ठराव घेतला. दरम्यान तसे निवेदन राज्याचे शिक्षणमंत्री, क्षेत्राचे आमदार, जि.प. अध्यक्ष, जि.प. शिक्षण सभापती, जि.प. शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी पं.स. गोरेगाव, गटशिक्षणाधिकारी, ठाणेदार गोरेगाव यांना ११ जूनला देण्यात आल होते. मात्र अद्याप यावर कसलीच कारवाई करण्यात आली नाही. यावरून गावकरी व पालकात असंतोष निर्माण झाला होता. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी शासन व जिल्हा परिषद स्तरावर नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. त्यातच सदर शाळा व महाविद्यालय म्हणून तालुक्यातील एकमेव शाळा आहे. मात्र याच शाळेत शिक्षकांच्या कमतरतेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होऊन त्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात दिसत आहे. यामुळे पालकांत रोष व्याप्त होता. यामुळेच शाळेच्या पहिल्या दिवशीच सकाळी ९ वाजता शिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले. (तालुका प्रतिनिधी)-
पहिल्याच दिवशी ठोकले शाळेला कुलूप
By admin | Updated: June 26, 2014 23:20 IST