शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आधी पूर्ण पैसे भरा, अनुदान खात्यावर जमा करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 20:39 IST

मागील वर्षी कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने खरीप हंगामासाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन दिले.

ठळक मुद्देजि.प.कृषी विभागाचे धोरण : शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने खरीप हंगामासाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन दिले. मात्र जेव्हा शेतकरी बियाणांची उचल करण्यासाठी पंचायत समितीमध्ये जात आहेत, तेव्हा त्यांना आधी बियाणांचे पूर्ण पैसे भरा, अनुदानाची रक्कम पंधरा-वीस दिवसांनी तुमच्या खात्यावर जमा करु, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र अद्यापही कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील पूर्ण पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी सरकारकडून तारीख पे तारीख दिली जात आहे.सरकारने शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी डीबीटी (थेट बँक खात्यात पैसे जमा) करण्याचे धोरण लागू केले आहे. तर अनुदानाची रक्कम जमा होण्यास तीन चार महिन्यांचा कालावधी लागत असल्याने लाभार्थी संबंधित विभागाच्या पायऱ्या झिजवून थकले आहेत. त्यातच आता दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकºयांना एकीकडे खरिपासाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देऊन शासनाने दिलासा दिला. तर दुसरीकडे बियाणांची संपूर्ण रक्कम आधी भरा, अनुदान नंतर बँक खात्यावर जमा करु, असे सांगून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू आहे. शासनाच्या ग्राम बिजोत्पादन योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ५० टक्के सवलतीवर बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे.त्याची व्यापक प्रचार-प्रसिध्दी कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. अर्ध्याच किंमतीत बियाणे मिळणार असल्याने शेतकरी त्या त्या तालुक्यातील पंचायत समितीतील कृषी विभागात बियाणांची उचल करण्यासाठी जात आहेत.पण तिथे गेल्यानंतर शेतकऱ्यांना वेगळ्याच अडचणीला सामोरे जावे लागत आहे. जि.प. कृषी विभागाने बियाणांची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना आधी बियाणांची पूर्ण रक्कम भरा, अनुदानाची रक्कम नंतर तुमच्या बँक खात्यावर जमा केली जाईल, असे सांगत आहे.त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. सुरूवातीलाच बियाणांची पूर्ण रक्कम भरायची होती तर अनुदान देण्याची घोषणा का केली, असा सवाल शिवाजी गहाणे, मुनिश्वर कापगते, गजानन परशुरामकर, माधव हटवार, देवाजी बनकर, नाजूक झिंगरे या शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.एका सातबारावर केवळ २५ किलो बियाणेशासनाने शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन दिले आहे. यासाठी शेतकऱ्यांना सातबारा आणि आधारकार्ड जोडणे अनिवार्य केले आहे. मात्र एका सातबारावर केवळ २५ किलो बियाणे दिले जात आहे. त्यामुळे ऐवढ्याच बियाणांमध्ये शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.दोन विभागांसाठी वेगळे नियम कसे?जि.प.कृषी विभाग व राज्य कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन दिले जात आहे. राज्य कृषी विभाग बियाणे वाटप करताना अनुदानाची रक्कम कपात करुन उर्वरित पैसे घेत आहे. तर जि.प. कृषी विभाग अनुदानाची रक्कम कपात न करता पूर्ण रक्कम शेतकऱ्यांकडून घेत आहे. त्यामुळे शासनाच्या एकाच विभागासाठी दोन वेगळे नियम कसे असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.प्रक्रिया करताच धानाची किंमत झाली दुप्पटशासनाने मागील वर्षी धानाला १५५० प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला होता. याच दराने जिल्ह्यातील बºयाच शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. महाबीजने याच धानावर प्रक्रिया करुन एमटीयू १०१०,एमटीयू १००१, आयआर ६४, सुवर्णा, जेसीएल १७९८, कर्जत ३ या प्रजातीचे धान बियाणे स्वरुपात ३६०० रुपये प्रती क्विंटल दराने विक्री करीत आहे. प्रक्रियेमुळे प्रती क्विंटल १ हजार रुपये खर्च जरी जोडला तरी शासन शेतकऱ्यांकडून बियाणांचे दुप्पट पैसे वसूल केले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी