शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

गिरोल्यात विधवेच्या घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 21:13 IST

जवळील ग्राम गिरोला येथील पुस्तकला प्रेमलाल पंधरे (४७) या गरीब विधवा महिलेच्या घराला रविवारी (दि.४) सकाळी १०.३० वाजतादरम्यान अचानक आग लागली.

ठळक मुद्दे सर्व सामान भस्मसात : १६ हजार रोख रकमेसह दीड लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जवळील ग्राम गिरोला येथील पुस्तकला प्रेमलाल पंधरे (४७) या गरीब विधवा महिलेच्या घराला रविवारी (दि.४) सकाळी १०.३० वाजतादरम्यान अचानक आग लागली. या आगीत त्यांच्या घरातील एकूण एक वस्तू जळून भस्मसात झाली असून यात रोख १६ हजार रुपयांसह सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.पुस्तकला पंधरे यांचे पती एक वर्षापूर्वी मरण पावले असून त्या आपल्या दोन मुले व आंधळ््या-बहºया सासू रायाबाई यांच्यासोबत राहतात. मोलमजुरी करून त्या कुटुंबाचा गाडा खेचत आहेत. मनरेगाच्या कामावर आपल्या मुलासह गेल्या असता त्यांच्या घराला आग लागली. गावातील युवक व पुस्तकलाबाई घरी पोहचतपर्यंत त्यांच्या घरातील सर्वच काही जळून खाक झाले होते.सासू रायाबाई घराच्या मागील भागात बसलेल्या होत्या व त्यांना कळलेच नाही. त्या घरातच असल्याचे कळताच गावातील संतोष तरोणे, सुरेश पंधरे, सचिन गजभिये, विजय बहेकार, राजेश मरकाम, राजेश पाऊलझगडे, सुखदेव पंधरे, मोरेश्वर मारवाडे यांनी त्यांना बाहेर काढले. आगीवर नियंत्रण मिळवत पर्यंत घरातील भांडीही वितळली होती.पुस्तकलाबाई सकाळी पुजा करून अंगरबत्ती लावून थोरला मुलगा मोहन यांच्यासोबत कामावर गेल्या होत्या. तर धाकटा कचारगड यात्रेत गेला होता. सासू रायाबाई घरी एकट्याच होत्या. अशात आग अगरवबत्तीने किंवा शॉटसर्कीटने लागली कळू शकले नाही. कारण या आगीत घरातील सर्व विद्युत उपकरणही भस्मसात झाले आहेत. तलाठी बी.डी.वरक डे यांनी पंचनामा केला.बचतगटाचे साहित्यही जळून खाकपुस्तकलाबाई महिला बचत गटाच्या गावच्या सीआरपी म्हणून काम करीत असून त्यांच्याकडे महिलांच्या ६० साड्या, आठ हजार रूपये रोख तसेच सर्व रेकॉर्ड होते. शिवाय पतीच्या तेरवीच्या कार्यक्रमात नातलगांनी दिलेल्या ५० साड्या व शर्ट-पँट पीस, घरात वापरायचे कपडे, धान्य सर्वच काही या आगीत भस्मसात झाले आहे. यामुळे आज पुस्तकलाबाईंच्या घरातील सदस्यांच्या अंगावर आहे तेच कपडे उरले आहेत.पुस्तकलाबाईंच्या घराला आग लागून सर्वच भस्मसात झाले आहे. अशात घर चालविण्यासाठी गावकरी मिळून तात्पुरती मदत करतील. शिवाय शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाईल.-परसराम फुंडेसरपंच, ग्रामपंचायत गिरोला

टॅग्स :fireआग