शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर लोधी समाजाचा केंद्रातील ओबीसी प्रवर्गात समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 16:19 IST

Gondia : लोधी समाज हा महाराष्ट्रातील मध्य प्रदेशलगत असलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास

लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : जवळपास २० वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याच्या सूचीमध्ये लोधी समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्रात नोकरीत आरक्षण आणि ओबीसी प्रवर्गात मिळणाऱ्या इतर सुविधा व सवलती लोधी समाजाला मिळत होत्या; परंतु लोधी समाजाचा केंद्रातील ओबीसी प्रवर्गात समावेश झाला नव्हता. त्यामुळे केंद्रातील ओबीसी आरक्षणाचा लाभ महाराष्ट्रातील लोधी समाजाला मिळत नव्हते. ही बाब लक्षात घेता लोधी समाजाचा केंद्रातील ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी समाजाचे नेते माजी आ. भेरसिंहभाऊ नागपुरे यांनी केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याशी चर्चा करून सतत पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत राज्य सूचीतील क्रमांक २६२ मधील राज्यातील लोध, लोधा, लोधी समाजाला केंद्रीय मागास प्रवर्गात समाविष्ट केले आहे. 

मूलतः शेती व शेतमजुरी करणारा लोधी समाज हा महाराष्ट्रातील मध्य प्रदेशलगत असलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. खुल्या प्रवर्गात असल्याने या समाजातील तरुण- तरुणींना नोकरीमध्ये आरक्षण मिळत नव्हते, तसेच शासनाच्या सोयीसुविधांचा लाभ मिळत. यामुळे लोधी समाजाने आपला समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यात यावा म्हणून संघर्ष सुरू केला. 

लोधी नेते भेरसिंह नागपुरे यांनी मोलाची भूमिका बजावली. २००४ मध्ये महाराष्ट्र शासनाने लोधी समाजाचा राज्य सूचीमध्ये ओबीसी प्रवर्गात समावेश केला. तेव्हा लोधी समाजाला मोठा दिलासा मिळाला; परंतु महाराष्ट्रातील लोधी समाजाला केंद्रात ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता. यासाठी महाराष्ट्रातील लोधी समाजाला केंद्रातील ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची गरज होती. यासाठी लोधी समाजाच्या पुढाऱ्यांनी दिल्लीपर्यंत धाव घेतली आणि धरणे आंदोलनसुद्धा केले; पण आतापर्यंत केवळ आश्वासन मिळाले. आमगाव विधानसभा क्षेत्रात २००४ ते २००९ या कालावधीत प्रतिनिधित्व करणारे लोधी नेते भेरसिंह नागपुरे यांनी आपला समाज केंद्रात ओबीसी प्रवर्गात समाविष्ट व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न केला. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याशी अनेकदा संपर्क आणि प्रत्यक्ष भेट घेतली. अखेर हंसराज अहिर यांनी विषयावर गांभीर्याने विचार केला आणि राज्य सरकारच्या सूचितील २६२ क्रमांकमधील लोधी, लोध, लोधा या जातींचा केंद्रीय मागास प्रवर्गात समावेश करण्याची शिफारस केली.  

टॅग्स :gondiya-acगोंदियाOBC Reservationओबीसी आरक्षण