शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सातबारामुळे शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 22:37 IST

शासनाने शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आॅनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली आहे. मात्र ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद राहत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर कामे करणे अवघड होत आहेत.

ठळक मुद्देसातबारामध्ये अनेक चुका : इंटरनेटची समस्या, शेतकऱ्यांची पायपीट

]लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : शासनाने शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आॅनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली आहे. मात्र ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद राहत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर कामे करणे अवघड होत आहेत.त्यामुळे आॅनलाईन सातबारा शेतकºयांसाठी सोयीचा ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरत आहे.अचूक संगणकीकृत सातबारा देण्यासाठी राज्यात भूमिअभिलेख शाखेकडून केंद्र पुरस्कृत डिजीटल इंडिया लँड रेकार्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफारची प्रणाली विकसीत केली आहे.फोर-टी क्वाईन हे साफ्टवेअर बंद होऊन क्लाऊड सॉफ्टवेअर सुरु करण्यात आले. या नवीन क्लाऊड सॉफ्टवेअरला तलाठ्यांचे ठसे नोंदणीकरीता ओटीपी नंबर टाकून नोंद करावी लागते. मात्र कधी सर्व्हर डाऊन तर कधी लिंक फेल होत असल्याचे शेतकऱ्यांना वेळीच सातबारा मिळण्यास अडचण होत आहे. काहीवेळा सर्व्हर सुरु होतो मात्र त्यात गती नसल्याने कामे होत नाहीत.आॅनलाईन सातबारावर चुका असल्याने त्या दुरुस्तीसाठी पुन्हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागतो. या प्रक्रियेतही बराच वेळ जात आहे. तलाठी, तहसील कार्यालयाकडे बोट दाखवत आहेत, तर कधी मंडळ अधिकारी यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला जातो.शेतकऱ्यांना मुलांच्या विविध दाखल्यांसाठी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक कर्ज अद्यावत करण्यासाठी सातबाराची गरज भासत आहे. मात्र, सातबारा चुकीचा असल्याने व चुकांची दुरुस्ती करण्यात वेळ लागत असल्याने आॅनलाईन सातबारा शेतकऱ्यांसाठी तापदायक ठरत आहे.

टॅग्स :InternetइंटरनेटFarmerशेतकरी