लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्ह्यातील ६६ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन आतापर्यंत ११ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. मात्र खरेदी केलेल्या धानाची अद्यापही भरडाईसाठी उचल करण्याचे आदेश दिले नाही. परिणामी १६० गोदाम हाऊस फुल झाले आहे.चार ते पाच दिवसांत या धानाची उचल न झाल्यास धान खरेदी ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा कोंडी होण्याची शक्यता आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सध्या जिल्ह्यातील ६६ धान खरेदी केंद्रावरुन खरेदी सुरू आहे. खरेदी सुरू होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला असून या केंद्रावरुन आतापर्यंत १० लाख ७८ हजार २०० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेला धान जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या १६० गोदामांमध्ये ठेवण्यात आला. मात्र आता गोदामांची साठवण क्षमता सुध्दा संपुष्टात आली आहे.त्यामुळे खरेदी करण्यात येत असलेला धान ठेवायचा कुठे असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. फेडरेशन अंतर्गत खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची भरडाई करुन तांदूळ शासन जमा केला जातो. मात्र यंदा अद्यापही गोदामातील धानाची भरडाई करण्यासाठी उचल करण्यात आलेली नाही. परिणामी फेडरेशनसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. धान खरेदी केंद्रावर दररोज ५० हजार क्विंटल धान खरेदी सुरुच असून तो धान साठवून ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असल्याने हा धान खराब होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. गोदामांमध्ये केवळ थोडीच जागा शिल्लक आहे. तर तीन चार दिवसात धानाची उचल न झाल्यास धान खरेदी थांबविण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे फेडरेशनच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.आदेशाने निर्माण झाली समस्याजिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी केंद्र परिसरात राईस मिल असेल आधी त्यांना धानाची उचल करण्याचे आदेश दिले आहे. मात्र हाऊस फुल झालेले बहुतेक गोदाम हे राईस मिल पासून दूर अंतरावर आहेत. त्यामुळे त्या धानाची उचल करण्याचे डिओ कसे द्यायचे असा प्रश्न फेडरेशनसमोर निर्माण झाला आहे.यावर तोडगा न निघल्यास ही समस्या वाढू शकते.महामंडळाचा ५ लाख क्विंटल धान उघड्यावरचआदिवासी विकास महामंडळातंर्गत ४४ धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जात आहे.आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. मात्र खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका बसून हा धान खराब होत असल्याची माहिती आहे.चुकाऱ्यांची समस्या कायमआदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाºया शेतकऱ्यांना अद्यापही धानाचे चुकारे न मिळाल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. चुकाºयांसाठी शेतकऱ्यांची बँका आणि केंद्रावर पायपीट सुरू आहे.या समस्येकडे सुध्दा संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
फेडरेशनचे १६० गोदाम फुल्ल खरेदी ठप्प होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सध्या जिल्ह्यातील ६६ धान खरेदी केंद्रावरुन खरेदी सुरू आहे. खरेदी सुरू होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला असून या केंद्रावरुन आतापर्यंत १० लाख ७८ हजार २०० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेला धान जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या १६० गोदामांमध्ये ठेवण्यात आला. मात्र आता गोदामांची साठवण क्षमता सुध्दा संपुष्टात आली आहे.
फेडरेशनचे १६० गोदाम फुल्ल खरेदी ठप्प होण्याच्या मार्गावर
ठळक मुद्दे११ लाख क्विंटल धान खरेदी : धानाची उचल न केल्याने समस्या