शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

अमानुष; जन्मदात्याने जमिनीवर आपटून केला बालिकेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 23:19 IST

Gondia News crime तिला या जगात येऊन जेमतेम सव्वादोन महिने झाले होते. आपल्या जन्मदात्याला डोळे भरूनही तिने पाहिले नव्हते. तत्पूर्वी त्याच जन्मदात्याने त्या निष्पाप बालिकेला जमिनीवर आपटून या जगातून संपविले.

ठळक मुद्दे पत्नीच्या चारित्र्यावर संशयखामखुरा येथील घटना

 लोकमत न्यूज नेटवर्क 

गोंदिया : तिला या जगात येऊन जेमतेम सव्वादोन महिने झाले होते. आपल्या जन्मदात्याला डोळे भरूनही तिने पाहिले नव्हते. तत्पूर्वी त्याच जन्मदात्याने त्या निष्पाप बालिकेला जमिनीवर आपटून या जगातून संपविले. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी तालुक्यातील खामखुरा या गावात घडली. मृतक बालिकेचे नाव नायरा भवेश राऊत असे आहे. आरोपीला अर्जुनी मोरगाव पोलिसांनी अटक केली आहे.

खामखुरा येथील निराशा हिचे भवेश राऊत ( करांडली ) याचेशी एक ते दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. भवेश हा मद्यपान करून तिला नेहमी मारहाण करायचा. तिच्या पोटात अंकुर वाढत असतांनाच या त्रासाला कंटाळून ती माहेरी खामखुरा येथे आली होती. ११ ऑक्टोबर रोजी तिने गोंडस बालिकेला जन्म दिला. त्याच्या मनात काय होते माहीत नाही. तो शुक्रवारी एका इसमासोबत दुचाकीने खामखुरा येथे आला. सासरच्या घराबाहेर दुचाकी उभी केली. सोबत असलेला इसम दुचाकीवरच स्वार होता. दुचाकी सुरुच होती. निराशा दरवाजात उभी होती. बालिका पाळण्यात झोपी गेली होती. निराशाला धक्के देत आरोपी भवेश घरात शिरला. त्याने पाळण्यातून बालिकेला बाहेर काढले व जमिनीवर जोरात आपटले. तिने आरडाओरड केली. तोपूर्वीच भवेश निघून गेला. बालिकेच्या कपाळ व डोक्याला जबर मार लागला होता. तिला अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तपासणीनंतर तिला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री साडेदहाच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. जन्मदाता आरोपी भवेश विरुद्ध अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात ३०२,३२३,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने बालिकेला नकोशी म्हणून की अन्य कारणांमुळे संपविले ते तपासात उघड होईल. सोमवारी (दि.२१)जिल्हा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक महादेव तोदले पुढील तपास करीत आहेत.

तिचे स्वप्न अधांतरीच

लग्नानंतर तिने सुखी संसाराची अनेक स्वप्न बघितली होती. पहिल्या मातृत्वाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. बालिकाही जन्माला आली. पण पतीने तिच्या स्वप्नांचा चुराडा केला. निराशा अत्यंत निराश झाली. आमच्या प्रतिनिधीने भेट घेतली तेव्हा तिचे अश्रू अनावर झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी