शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

शेतकऱ्यांना मिळणार विषारी कीटकनाशकापासून मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 05:00 IST

पिक आणि किडीच्या प्रकारानुरुप हेक्टरी एक ते अडीच तास ट्रायकोग्राम ७ ते १० दिवसांच्या अंतराने एकूण ४ ते ६ वेळा पिकांच्या पानांना किंवा तणांना लावावे लागतात. ट्रायकोग्रामा लावल्यानंतर काही तासांतच किंवा दुसऱ्या दिवशी प्रौढ ट्रायकोग्राम बाहेर निघून हानीकारक किडींच्या अंड्यांचा शोध घेतात आणि त्यात स्वत:ची अंडी घालतात आणि तिथे किडींचा नाश होतो.

ठळक मुद्देट्रायकोग्रामाने होणार कीडींचा नाश : कुणबीटोला येथे पहिला प्रयोग, आणखी ७ गावांची निवड

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : अलीकडच्या काळात शेतकरी आपल्या शेतात किडींचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशक विषारी औषधींचा वापर करीत आहे. या विषारी औषधींचा तात्कालीक व दुरगामी दोन्ही प्रकारे भयंकर परिणाम मानवालाच नाही तर इतर पशु-पक्ष्यांना भोगावे लागत आहेत. इतकेच नव्हे तर औषधींचा छिडकाव करताना अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण ही गमवावे लागले आहे. या संकटावर मात करण्यासाठी कृषी विभागाने ट्रायकोग्रामा नावाचा मित्र किटक तयार केला असून हा परजीवी किटक हानीकारक किडींचा नायनाट करतो. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने ग्राम कुणबीटोला येथे ट्रायकोग्रामा लावण्याचा पहिला यशस्वी प्रयोग करण्यात आला असून कृषी विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यात याचा वापर व्हावा म्हणून नुकतेच पहिली प्रयोगशाळा स्थापित करुन ट्रायफोग्रामा तयार करण्यास सुरुवात झाली आहेट्रायफोग्रामा हा पतंगवर्गीय हानीकारक किडींच्या अंड्यांवर जगणारा एक छोटासा परजिवी किटक आहे. त्यामुळे किडींचा नाश अंडी अवस्थेतच होते. हा एक मित्र किटक म्हणून काम करतो. एका ट्रायकोकार्डवर २० हजार ट्रायकोग्राम असतात.पिक आणि किडीच्या प्रकारानुरुप हेक्टरी एक ते अडीच तास ट्रायकोग्राम ७ ते १० दिवसांच्या अंतराने एकूण ४ ते ६ वेळा पिकांच्या पानांना किंवा तणांना लावावे लागतात. ट्रायकोग्रामा लावल्यानंतर काही तासांतच किंवा दुसऱ्या दिवशी प्रौढ ट्रायकोग्राम बाहेर निघून हानीकारक किडींच्या अंड्यांचा शोध घेतात आणि त्यात स्वत:ची अंडी घालतात आणि तिथे किडींचा नाश होतो. ट्रायकोग्रामाचा वापर केल्यावर इतर कोणत्याही रासायनिक किटकनाशक औषधींचा छिडकाव करण्याची गरज पडणार नाही.जास्तीतजास्त उत्पादन प्राप्त करण्याच्या उद्देशातून शेतकरी पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर वाढवित आहे. परंतु त्याचबरोबर पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशात शेतकरी रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी किंवा कीडीचा नायनाट करण्यासाठी विषारी किटकनाशकांचा अतोनात वापर करु लागला आहे. रोवणीपासून तर थेट कापणीपर्यंत विविध रोगांसाठी वेगवेगळ्या विषारी औषधींचा छिडकाव केला जात आहे. सततच्या औषध फवारणीमुळे पिकांवरील रोगांवर काही काळासाठी नियंत्रण मिळविले जावू शकते. परंतु विषारी औषधींमुळे पिकांना पोषक असणारे मित्र किट सुद्धा नष्ट होतात. त्यामुळे लगेच काही दिवसांत दुसºया रोगांचा प्रादुर्भाव होतो. विषारी औषधींमुळे बेडूक व साप सारख्या अनेक जीवांचा सुद्धा नाश होतो. त्यामुळे या सृष्टी चक्रावर वाईट परिणाम होत चालला आहे.औषधीयुक्त अन्न ग्रहण केल्याने विविध प्रकारच्या नवनवीन विकारांचा प्रभाव शरीरावर होत चालला आहे. एवढेच नाही तर पशु-पक्ष्यांचे प्रमाण सुद्धा झपाट्याने कमी होत चालले आहे. अशा परिस्थितीत कृषी विभाग सुद्धा सारखा चिंतेत पडला आहे. अशात ट्रायकोग्रामा मित्र किडीचा शोध व वापर करुन रोगावर नियंत्रण करता आल्यास याचा मोठा दूरगामी लाभ मिळेल.ट्रायकोग्रामाचा वापर कसा करावाप्रयोगशाळेत एका सरड्यावर ट्रायकोग्रामा परजीव किटक तयार केले जातात. वापरण्याच्यावेळी असल्याप्रमाणे पट्ट्याकात्रीने कापाव्या लागतात. बंद पॉलिथीन डब्यात टाकून शेतात नेऊन स्टॅपलरच्या सहायाने प्रत्येक प्रत्येक पट्टी झाडाच्या पानाखाली उन्ह आणि प्रकाश पडणार नाही अशारितीने आणि ट्रायकोग्राम जमीनीकडे राहिल अशी टाचली जाते. एका काडीवरील सर्व वोस पट्ट्या किमान १ एकर शेतभर पुरतील एवढ्या अंतरावर लावल्या जातात. ट्रायकोेग्रामा पट्टीचा वापर हाती आल्यावर लगेच करावा लागतो. त्वरित शक्य नसल्यास कार्डला प्लास्टिक पिशवित टाकून फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी किंवा दिलेल्या मुदतीच्या आत वापरने आवश्यक असते.तालुक्यात १७५ शेतकऱ्यांना ट्रायकोग्रामा वाटपतालुका कृषी अधिकारी ए.एल. दुधाने यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील ७ गावांतील एकूण १७५ शेतकºयांना ट्रायकोग्रामा कार्ड मोफत दिले जात आहे. कृषी सहायक तिर्थराज तुरकर आणि आर.आर.भगत यांनी तालुक्यातील कुणबीटोला गावात ट्रायकोग्राम लावण्याचा तालुक्यातील पहिला प्रयोग केला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील ग्राम कुणबीटोला, पांढरवाणी, भन्सूला, सलंगटोला, वंजारी, रोंढा आणि दंडारी या गावांची यंदा निवड करण्यात आली असून प्रत्येक गावातील १५ शेतकऱ्यांच्या शेतात पीक प्रात्यक्षिक घेतले जात आहे. त्यानुसार १७५ एकरातील धान पीकावर ट्रायकोग्रामाचा प्रयोग केला जात आहे. गोंदियाच्या कारंजा स्थित कृषी चिकित्सालय केंद्रात नुकतीच ट्रायकोग्रामाची निर्मिती सुरु झाली आहे. यंदा जिल्ह्यातील जवळपास १०० गावांना ट्रायकोग्रामाचा पुरवठा केला जात असून येणाºया वर्षात प्रत्येक कृषी केंद्रावर ट्रायकोग्रामा- उपलब्ध होऊ शकेल.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती