शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी शेतकऱ्यांचे इटियाडोह धरणावर साखळी उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

इटियाडोह धरण गोंदिया जिल्ह्यासाठी वरदान आहे. हे धरण अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगाव येथे बांधण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती धरणामध्ये गेली. ज्यांची शेती धरणात गेली त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. ते सुद्धा सिंचनापासून वंचित होणार आहेत. मागील काही वर्षांपासून धरणाच्या सिंचनाला घेऊन रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या रोटेशन पद्धतीमुळे तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची भीती आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : रब्बी हंगामाच्या धान पिकासाठी इटियाडोह धरणाचे पाणी देण्यात यावे, या मागणीला घेऊन धरण परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी धरणाच्या गेटसमोर शुक्रवारपासून (दि.३१) तीन दिवसीय साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.इटियाडोह धरण गोंदिया जिल्ह्यासाठी वरदान आहे. हे धरण अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगाव येथे बांधण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती धरणामध्ये गेली. ज्यांची शेती धरणात गेली त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. ते सुद्धा सिंचनापासून वंचित होणार आहेत. मागील काही वर्षांपासून धरणाच्या सिंचनाला घेऊन रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या रोटेशन पद्धतीमुळे तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची भीती आहे. रोटेशन पद्धत हा पाणी वापर संस्थांचा एकप्रकारचा जावईशोधच आहे. यावर्षी रब्बी हंगामाला तालुका सोडून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीपर्यंत पाणी देण्यात येणार, असे पाणीवाटप संस्थांनी ठरविले. यामुळे धरण परिसरातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहणार आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांत असंतोष आहे. धरण परिसरातील शेतकऱ्यांचा धरणाच्या पाण्यावर प्रथम अधिकार आहे. रब्बी हंगामाला धरणाचे पाणी द्या या मागणीसाठी परिसरातील शेकडो शेतकरी धरणाच्या गेटसमोर शुक्रवारपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. हे साखळी उपोषण तीन दिवस चालणार आहे. शेतकऱ्यांची मागणी मान्य न झाल्यास या उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होईल, अशी माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे. प्रशासनाने या प्रश्नावर त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी रतिराम राणे, यशवंत परशुरामकर, यशवंत गणवीर, दीनदयाल डोंगरवार, संजय ईश्वार, राजहंस ढोके, नारायण हटवार, विनोद किरसान, राधेश्याम साखरे, राजकुमार तुलावी, जागेश्वर भोगारे, धनराज हर्षे, गुलाब भोयर, आनंदराव तिरगम, भिवा मलगाम, मधू गहाणे, योगराज हलमारे, त्र्यंबक झोळे, प्रमोद डोंगरवार, मनोहर बडवाईक, हेमंत देशमुख, संजू देशमुख, शिगू कोवे, हेमराज नाईक, प्रभू नंदनवार, शिवलाल वाघमारे, मोहन दानी, भाष्कर दखने, सोमा नरवास, रूपलाल गहाणे, प्रेमलाल करंडे, दीपक राणे, विनोद किरसान, तुलसीदास कोडापे, यशवंत भोयर, निलकंठ हटवार, विष्णू सिकदार, दीपक चक्रवर्ती आणि शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्पagitationआंदोलन