शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, तुम्ही बोगस बियाणे कसे ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 18:28 IST

Gondia : शेतकऱ्यांची सतर्कता महत्त्वाची कृषी विभागही 'अलर्ट मोड'वर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगाम एका महिन्यावर येऊन ठेपला असून, यंदा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे अनधिकृत, बोगस बियाण्यांची एन्ट्री होऊ नये म्हणून कृषी विभागाची सात भरारी पथकेही सतर्क झाली. शेतकऱ्यांनी अनधिकृत, बोगस बियाणे कसे ओळखावे? याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले जाणार आहे.

निवडणूक आटोपल्यानंतर जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाने देखील 'अलर्ट मोड'वर येत खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू केली. शेतकरी देखील शेती मशागतीच्या कामांकडे वळले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामात १ लाख ९३ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले. हा धान उत्पादक भाग असल्याने यंदाही खरीप हंगामात धानाची सर्वाधिक १ लाख ८४ हजार हेक्टरवर लागवड होणार आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने बी बियाणे,  कीटकनाशके यांचे नियोजन केले आहे.

असे ओळखा बोगस बियाणेशासनाचा उत्पादन अथवा विक्री परवाना नसणे, बीज प्रमाणीकरण यंत्रणे- कडून प्रमाणित नसलेले बियाणे, तपासणी केल्याचा रिपोर्ट नसल्यास बियाणे अनधिकृत किंवा बोगस असल्याचे मानले जाते. बोगस बियाण्याच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली याचा उल्लेख नसतो. पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण नसते.

काळजी काय घ्यावी?अधिकृत परवानाधारक कृषी विक्रेत्यांकडून बियाणे, खते खरेदी करावी. खरेदीवेळी न चुकता पक्के बिल घ्यावे. देयकात पीक, वाण प्लॉट क्रमांक, वजन, अंतिम मुदत, कंपनीचे नाव संपूर्ण नमूद असावे. कृषी केंद्रधारकाने पक्के बिल संपूर्ण विवरणासह न दिल्यास नजीकच्या कृषी विभागाकडे संपर्क साधावा.

नियंत्रण कक्षाची स्थापनाजिल्ह्यात खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कीटकनाशकाचा पुरवठा व निविष्ठांचा काळाबाजारावर प्रतिबंधासाठी तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) मध्ये तक्रार दाखल करावी. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व समस्यांचे निराकरण नियंत्रण कक्षात करण्यात येणार आहे. बियाणे, खते व कीटकनाशकांची खरेदी करतेवेळेस शेतकऱ्यांना विविध अडचणी येतात. या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनो येथे नोंदवा तक्रारनियंत्रण कक्षात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किमत, साठेबाजी व लिकिंगबाबत असलेल्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. अतिरिक्त दराने खताची विक्री होत असल्यास बियाणे, खते खरेदीचे बिल मिळत नसल्यास शेतकऱ्यांनी आपल्या नावासह व संपूर्ण पत्ता, तक्रारीचे स्वरूप यांची माहिती देऊन निवारण कक्षात तक्रार नोंदवावी.

खरीप हंगामासाठी खते, बियाणे यांची पुरेशा प्रमाणात मागणी नोंदविण्यात आली. उर्वरित लागणारे बियाणे शेतकऱ्यांकडे घरगुती पद्धतीने जतन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात अनधिकृत बियाण्यांचा शिरकाव होणार नाही याची दक्षता म्हणून आठ भरारी पथके सक्रिय ठेवण्यात आली. - हिंदूराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी