शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सर्वांनाच चमत्काराची आशा

By admin | Updated: March 11, 2016 02:20 IST

सडक अर्जुनी : बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्या विक्कीला काढण्यासाठी एकीकडे प्रशासकीय यंत्रणेने गेल्या ३० तासांपासून अविरत प्रयत्न सुरू असताना

विक्की खोलवर अडकल्याने अडचणीपुण्यासह कामठीच्या पथकाचे बचावकार्यपंचक्रोशीतील नागरिकांचे पावलं राकाकडेसडक अर्जुनी : बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्या विक्कीला काढण्यासाठी एकीकडे प्रशासकीय यंत्रणेने गेल्या ३० तासांपासून अविरत प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे तो सुरक्षित असेल का, याची धास्ती सर्वांना लागली आहे. काहीतरी चमत्कार व्हावा आणि तो सुखरूपपणे बाहेर यावा, अशी आशा सर्वांना लागली आहे.तातडीने पुण्यावरून बोलविण्यात आलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाकडून (एनडीआरएफ) गुरूवारी सकाळपासून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. सोबतच विक्कीच हालचालीही टिपण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र खड्डा अतिशय अरूंद आणि बोअरवेलच्या आत पाणी असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकल्यासोबत घडलेल्या या घटनेने समाजमन सुन्न झाले असून राका या गावात स्मशानशांतता निर्माण झाली आहे. विक्की कधी येणार अशी वाट बघत दोनोडे परिवाराच्या नजरा त्याच्याकडेच लागून आहेत. तालुक्यातील ग्राम राका येथील रहिवासी खुशाल दोनोडे यांच्या कुटुंबात आई, पत्नी व तीन मुले असा असे सदस्य आहेत. मुलांमध्ये सहा वर्षाचा मोठा मुलगा असून दोन जुळ््यांत विक्की हा एक होता. बुधवारी (दि.९) सायंकाळी ४ आजी शेळ््या चारत असताना खेळता-खेळता विक्की बोअरवेलच्या खड्ड्यात पडला. घटनेची माहिती मिळताच सुमारे ६ वाजतापासून यंत्रणा कामाला लागली व विक्कीला बोअरच्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. गोंदियावरून मिलिटरी फायर कॅम्प घटनास्थळी बोलावण्यात आला. त्यांनी गळ व हूक टाकून विक्कीला काढण्याचा प्रयत्न केला असता रात्री ११ वाजता गळाला फक्त कपडे अडकून आल्यामुळे तो चांगलाच फसला असल्याचे लक्षात आले.पुणे येथील एन.डी.आर.एफची टिम पुणेवरून दाखल झाली आणि त्यांनी आपली बचाव कार्य सुरू केले. घटनास्थळाचे निरीक्षण करुन आणि आपल्या अनेक उपकरणांचा वापर करून प्रयत्न केले असता त्यांनी विक्की खोलवर अडकल्याचे सांगितले. बुधवारपासून अडक लेल्या विक्कीला काढण्यासाठी वैद्यकीय पथक धडपड करीत असतानाच दुसरीकडे बोअरवेलच्या लगत खोदकाम करून त्याला बाहेर काढण्यासाठी खोदकाम केले जात आहे. गुरूवारी रात्री वरिष्ठ अधिकारी घटनास्थळीच होते. सकाळपर्यंत हे खोदकाम पूर्ण होऊन विक्कीला बाहेर काढणे शक्य होणार आहे. मात्र तो सुखरूप बाहेर यावा याचीच आस सर्वांना आहे.हसता खेळता गोजिरवाणा विक्की त्या खड्ड्यातून सुखरूपपणे बाहेर निघावा, यासाठी सर्व कुटुंबीय आस लावून बसले आहेत. विक्कीचे काय होणार, याची धास्तीही त्यांच्यात आहे. त्यामुळेच हे कुटुंबीय नि:स्तब्ध झाले आहेत. दोनोडे कुटुंबीय काहीच बोलण्याच्या स्थितीत नाहीत. दोनोडे कुटुंबातच नाही तर संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरली आहे. कुणीही काही बोलण्याच्या स्थितीत दिसत नाही. सर्वांच्या डोळ््यापुढे चिमुकल्या विक्कीचा चेहरा येत असून तो सुखरूप बाहेर यावा, यासाठी मनोमन सर्वजण प्रार्थना करीत आहेत.गावाला आले छावणीचे रूप घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, तहसीलदार व्ही.एम.परळीकर यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते. याशिवाय फायर ब्रिगेड, वैद्यकीय पथक, रूग्णवाहिका, पोलीस बंदोबस्त व बघ्यांची गर्दी यामुळे राका गावाला छावणीचे रूप आले आहे. पुण्याच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (एनडीआरएफ) टेप टाकून पाहणी केली असता सुमारे १४० फूट खोलवर विक्कीचा मृतदेह अडकल्याचे सांगितले. रात्री १० वाजेपर्यंत ५० फूट खोदकाम झाले होते. रात्रभर खोदकाम सुरूच राहणार असून सकाळीच विक्कीला बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे.असा घडला घात घटनेच्या एक दिवसापूर्वी मंगळवारी शेतकरी देवराम चांदेवार यांनी आपल्या शेतात बोअरवेल खोदली होती. मात्र बोअरला पाहिजे तसे पाणी न लागल्याने त्यांनी बोअरमध्ये केसिंग टाकली नव्हती. त्यामुळे बोअरच्या खड्ड्यावर त्यांनी पोते टाकून तोंड बंद केले होते. बुधवारी विक्की आपल्या त्या भागात आजीसोबत गेला होता. आजी शेळ््या चारत असताना खेळता-खेळता विक्की बोअरजवळ गेला व त्यात पडला. सांयकाळी ४ वाजतादरम्यानची वेळ होती. शेतकरी चांदेवार यांच्यावर कारवाई व्हावी एवढेच विक्कीचे वडील खुशाल दोनोडे यांचे म्हणणे आहे.