लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : वन आणि वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचाºयांने कटिबध्द असले पाहिजे. निसर्ग संपदेचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे असल्याचे मत मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) संजीव गौड यांनी केले.व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संरक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेवून वनांचे रक्षण करणारे वनपाल व वनरक्षकांना नुकतेच नवेगावबांध येथील अरण्यवाचन सभागृहात नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील कर्मचाºयांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ.रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक एस.युवराज, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक अमलेंदू पाठक, विभागीय वन अधिकारी गीता पवार उपस्थित होते. व्याघ्र प्रकल्पातील अविरत सेवा देवून उत्कृष्ट काम करणारे, उत्कृष्ट कर्मचारी, सर्वसाधारण उत्कृष्ट महिला कर्मचारी, सेल्फी फॉर टायगर, वनसंरक्षणाच्या दृष्टीने व विशेष व्याघ्र संरक्षण दलात प्रभावी आणि उत्कृष्ट काम करणाºया वनपाल व वनसंरक्षकांना प्रत्येकी एक हजार रुपये बक्षिस व सन्मानपत्र देवून मुख्यवनसंरक्षक गौड यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. २५ वनपाल, वनसंरक्षक व २ महिला वनरक्षकांचा समावेश आहे. एक नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून व्याघ्र प्रकल्पांतर्गत जननी कल्याण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्या कर्मचाºयांना सन २०१६-१७ या वर्षात मुलगी अपत्य म्हणून प्राप्त झाली आहे. त्यांना प्रत्येकी ५ हजार रु पयांचा पहिला हप्ता यावेळी देण्यात आला.१० वी १२ वीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या वन कर्मचाºयांच्या चार पाल्यांना प्रत्येकी एक हजार रु पयांचे पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. महिला सशक्तीकरणा अंतर्गत महिलांना योग्य सन्मान व पुरस्कार देण्यासाठी राज्यात केवळ नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पांंतर्गत जननी कल्याण योजना कार्यान्वीत करण्यात आल्याचे गोवेकर यांनी सांगितले.
वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी कटिबद्ध असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 21:47 IST
वन आणि वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचाºयांने कटिबध्द असले पाहिजे. निसर्ग संपदेचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे असल्याचे मत मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) संजीव गौड यांनी केले.
वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी कटिबद्ध असावे
ठळक मुद्देवन कर्मचारी सन्मानित : नवेगाव-नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान