शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

बिंदलच्या घटनेनंतरही धडा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:51 PM

२१ डिसेंबर २०१६ चा बुधवारचा दिवस गोंदियाच्या इतिहासात काळा दिवस ठरला. संपूर्ण गोंदिया पहाटेच्या साखरझोपेत असताना गोरेलाल चौकात मात्र एकच आगडोंब उठला होता.

ठळक मुद्देसुरक्षाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष : नोटीस बजावून विभाग मोकळा

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : २१ डिसेंबर २०१६ चा बुधवारचा दिवस गोंदियाच्या इतिहासात काळा दिवस ठरला. संपूर्ण गोंदिया पहाटेच्या साखरझोपेत असताना गोरेलाल चौकात मात्र एकच आगडोंब उठला होता. मुख्य चौकातील हॉटेल बिंदल आगीच्या ज्वाळांनी लपेटले होते. सर्वत्र एकच धावपळ सुरू होती. बाहेरच्या कडाक्याच्या थंडीतही या उष्ण ज्वाळांनी घटनेचे प्रत्यक्षदर्शी असणाऱ्यांच्या शरीरालाच नाही तर मनालाही चटके लागत होते. गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आगेने सर्वच जण हादरून गेले होते. ही आग जेवढी बाहेरून भयानक दिसत होती त्यापेक्षा कितीतरी पटींनी हॉटेलच्या आतून धगधगत होती. त्यात होरपळून आणि गुदमरून सात जीवांना नाहक प्राणाला मुकावे लागले. आताही तो संपूर्ण घटनाक्रम आठवला की अंगावर शहारे येतात.२१ डिसेबर २०१६ ची पहाट गोंदिया शहरवासीय कधीही विसरु शकणार नाहीत. गोरेलाल चौकातील हॉटेल बिंदल प्लाजा ला आग लागल्याने ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेला आता आता वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी नगर परिषद आणि प्रशासनाने कुठलाच धडा घेतलेला नाही. मागील वर्षभरात नगर परिषद अग्नीश्मन विभागाने केवळ हॉटेल संचालकांना नोटीस बजावण्यापलिकडे काहीच केले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे आगीच्या घटनेनंतरही हॉटेल बिंदल प्लाजाचे फायर आॅडिट केले नसल्याची माहिती आहे. नगर परिषदेच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार फायर आॅडिट करण्यासाठी शहरातील ७० ते ७५ लोकांना नोटीस बजाविण्यात आली. यात हॉटेल व्यावसायीक, क्लिनीक, बियर बार आदींचा समावेश आहे. नोटीसनंतर ५० जणांनी फायर आॅडिटची रिर्पोट सादर केली तर २८ जणांनी अद्यापही संबंधित विभागाकडे फायर आॅडिट रिर्पोट सादर केला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अग्नीश्मन विभागाने या सर्व संस्थानी अग्नीश्मन यंत्रे व आश्यक उपाय योजना केल्या किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.सर्वेक्षणानंतर सुरक्षा विषयक यंत्रसामुग्री न लावणाºया संचालकावर फायर अ‍ॅक्ट -५ अंतर्गत नोटीस बजावून कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात अग्नीशमन विभागाचे प्रभारी फायर अधिकारी शोभेलाल पटले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फायर आॅडिट करिता केवळ नोटीस बजावल्याचे सांगितले.कर्मचारी संख्या ७५ वरुन ३० वरयेथील अग्नीश्मन विभागात १९९५ मध्ये ७५ कर्मचारी कार्यरत होते. मात्र आता या विभागात केवळ ३० कर्मचारी कार्यरत आहेत. मागील २२ वर्षांत शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शिवाय व्यावसायीक प्रतिष्ठाणामध्ये सुध्दा वाढ झाली. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांची आणि अग्नीश्मन वाहनाची संख्या वाढविण्याची गरज होती. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे चित्र आहे.आगीच्या घटनांमध्ये वाढशहरात मागील वर्षभरात आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत हा विभाग अद्यापही अपडेट झालेला नाही. या विभागात एका शिप्टमध्ये केवळ ७-८ कर्मचारी काम करतात. त्यातही या विभागाच्या कर्मचाºयांवर दुसरीच कामे सोपविली जातात. त्यामुळे एखाद्या वेळेस आगीची घटना घडल्यास तिथे वेळीच पोहचणे शक्य होत नाही. या समस्येने या विभागाचे कर्मचारी सुध्दा हैराण आहेत.अतिक्रमणाची समस्या कायमशहरातील मुख्य मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा काहींनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आगीची घटना घडल्यास त्या ठिकाणी अग्नीश्मन वाहन पोहचण्यास मोठी अडचण जाते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेले अतिक्रमण हटवून रस्ते रुंद करण्याची गरज आहे. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही.अग्नीश्मन वाहन नादुरुस्तवर्षभरापूर्वी हॉटेल बिंदल प्लाजाला आग लागल्याची घटना घडली. तेव्हा गोंदिया अग्नीश्मन विभागाचे वाहन फार उशीराने घटनास्थळी पोहचले होते. त्यामुळे वेळेवर मदत मिळण्यास अडचण निर्माण झाली होती. शहरातील अरुंद रस्त्यांमुळे अग्नीश्मन विभागाच्या कर्मचाºयांना विविध अडचणीना तोंड द्यावे लागले होते. त्यावेळी अग्नीशमन विभागाकडे २ मिनी टँकर, आणि २ वॉटर टँकर उपलब्ध होते. मागील बºयाच वर्षांपासून अग्नीश्मन विभागाला नवीन वाहन मिळालेले नाही. वर्षभरापूर्वी नादुरस्त अग्नीश्मन वाहनाची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. मागीेल काही वर्षांपासून या विभागाला कायम स्वरुपी फायर अधिकारी नाही.