शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इटियाडोह जलाशय आणि प्रतापगड पर्यटनस्थळ पडले ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशय आणि प्रतापगड पावसाळ्यात हिरवागार शालू परिधान करुन नव्या नवरीसारखे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज राहते. पावसाळयात या भागातील नैसर्गिक हिरवेगार मनमोहक दृश्य व पर्वतरांगा पर्यटकांच्या आनंदात भर घालतात. त्यात अजून इटियाडोहमधून होणारा पाण्याचा विसर्ग, धबधबा स्थळ व ध्वनी कंपनाची नैसर्गिक प्रक्रिया पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग होवून जाते.

ठळक मुद्देकोरोना महामारीचा फटका : पर्यटन स्थळांवर आली अवकळा

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपैकी प्रमुख स्थळ म्हणून पर्यटकांसाठी इटियाडोह जलाशय आणि प्रतापगड हे स्थळ आकर्षणाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात हे पर्यटनस्थळ पर्यटकांच्या गर्दीमुळे फुलून जाते. मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे या स्थळावर अवकळा पसरली असून ओसाड पडल्याचे चित्र आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. परिणामी पर्यटनस्थळावर अवलंबून असणाऱ्या छोट्या-छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशय आणि प्रतापगड पावसाळ्यात हिरवागार शालू परिधान करुन नव्या नवरीसारखे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज राहते. पावसाळयात या भागातील नैसर्गिक हिरवेगार मनमोहक दृश्य व पर्वतरांगा पर्यटकांच्या आनंदात भर घालतात. त्यात अजून इटियाडोहमधून होणारा पाण्याचा विसर्ग, धबधबा स्थळ व ध्वनी कंपनाची नैसर्गिक प्रक्रिया पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग होवून जाते. परंतु यावर्षी कोरोना महामारीने प्रतापगड व इटियाडोह जलाशय ओस पडले आहेत. या स्थळांवर अवकळा आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या पर्यटनस्थळावर अवलंबून असणाऱ्या छोट्या-छोट्या व्यावसायीकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सहजच मार्गी लागत असे. मात्र यावर्षीचे चित्र बघता त्यांच्यावर उपासमारीचे संकट घोंगावत असल्याचे दिसून येते. या परिसरातील अत्यंत विलोभनीय दिसणाऱ्या पर्वत रांगा, इटियाडोह जलाशयात मध्यभागी उभ्या असलेल्या हिरव्यागार टेकड्या पर्यटकांसाठी सेल्फीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोरोनाच्या महामारीने पर्यटकांची इच्छाशक्ती मारली जावून इच्छाशक्तीवर कोरोनामुळे पाणी फिरविल्याचे दृश्य दिसून येत आहेत.या दोन्ही स्थळांना भेट दिली असता कोरोना काळात कोणीही पर्यटक येत नसून येथील छोट्या-छोट्या व्यावसायीकांवर उपासमारीची वेळ आल्याचे सांगण्यात आले. या पर्यटनस्थळाकडे जशी पर्यटकांनी पाठ फिरविली तशीच शासनाने सुद्धा पाठ फिरविल्याचे चित्र आहे. येथे असलेल्या मुलभूत सुविधा उदा. पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह व पार्कीग व्यवस्थेची पार वाट लागली असल्याचे दिसून आले. इटियाडोहच्या मुख्य कॅनलवर गैरसोय निर्माण करणाºया झुडपांची वाढ झाल्यानमे त्यांची छाटणी होणे अपेक्षीत आहे. पर्यटक नसले तरीही या मुुुलभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक असून पर्यटनस्थळाच्या विकासात भर घालीत असतात हे निश्चित.

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प